लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर चेकपोस्ट नाका, वाहनांची तपासणी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 01:31 PM2024-03-06T13:31:01+5:302024-03-06T13:31:47+5:30

सुशांत घोरपडे म्हैसाळ : लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमीवर मिरज ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर म्हैसाळ जवळ चेकपोस्ट उभा केला आहे. याठिकाणी वाहनांची ...

In the wake of the Lok Sabha elections checking of vehicles at checkposts on the Maharashtra-Karnataka border will begin | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर चेकपोस्ट नाका, वाहनांची तपासणी सुरु

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर चेकपोस्ट नाका, वाहनांची तपासणी सुरु

सुशांत घोरपडे

म्हैसाळ : लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमीवर मिरज ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर म्हैसाळ जवळ चेकपोस्ट उभा केला आहे. याठिकाणी वाहनांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येत आहे.

सद्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. याअनुशंगाने आंतरराज्य तसेच आंतरजिल्ह्यातील सीमा चौक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय काल, मंगळवारी कोल्हापुरात झालेल्या समन्वय बैठकीत घेण्यात आला होता. दरम्यानच, मिरज ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर चेकपोस्ट उभा केले असून या पथकात दोन पोलीस अधिकारी, तीन पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांचा समावेश करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या कालावधीत वाहनातून बनावट दारु, गुटखा, अवैध धंदे यांची वाहतूक होण्याची शक्यता आहे. याला आळा बसावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी वाहनांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर चेकपोस्ट उभा केले आहे. याद्वारे वाहनांची तपासणी, बनावट दारू,गुटखा यांची तस्करी होणार नाही. यादृष्टीने पोलीस काटेकोरपणे तपासणी करत आहेत. - भैरव तळेकर, पोलीस निरीक्षक-मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन

Web Title: In the wake of the Lok Sabha elections checking of vehicles at checkposts on the Maharashtra-Karnataka border will begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.