सांगलीच्या काही भागात आज अपुरा पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:26 AM2021-04-08T04:26:58+5:302021-04-08T04:26:58+5:30
सांगली : माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रातील ५६ एमएलडीच्या जुन्या पंप हाऊसजवळ मेलफोल्ड रायझिंग मुख्य पाईपलाईनला बुधवारी सकाळी अचानक मोठी ...
सांगली : माळबंगला जलशुद्धीकरण केंद्रातील ५६ एमएलडीच्या जुन्या पंप हाऊसजवळ मेलफोल्ड रायझिंग मुख्य पाईपलाईनला बुधवारी सकाळी अचानक मोठी गळती लागली. त्यामुळे दुरुस्ती सुरु करण्यात आली आहे. यामुळे शहराच्या काही भागात गुरुवारी दिवसभर कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
मोठ्या स्वरूपाची ही गळती असून, त्याची तातडीने येथील पंपहाऊसचे पंपिंग बंद ठेवून दुरूस्ती हाती घेण्यात आली आहे. ही दुरूस्ती युद्धपातळीवर करण्यात येत आहे. यामुळे उद्या ८ एप्रिल रोजी माळबंगला केंद्रातील जुन्या व नवीन टाकीतून केला जाणारा यशवंतनगर, काळीखण, जयहिंद कॉलनी, वसंतनगर टाकी झोनमधील भागाचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा अभियंता परमेश्वर हलकुडे यांनी केले आहे.