मिरजेत ‘चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलन’,रविवारी आयोजन : श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:59 AM2018-03-08T00:59:32+5:302018-03-08T00:59:32+5:30

 Inauguration of 'Chaitanya Vrangan Sahitya Sammelan' in Miraj, organized on Sunday: Shripal Sabnis | मिरजेत ‘चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलन’,रविवारी आयोजन : श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन

मिरजेत ‘चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलन’,रविवारी आयोजन : श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन

Next

मिरज : दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभा, कोल्हापूर व शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ, मिरज यांच्यातर्फे रविवारी (दि. ११) दक्षिण महाराष्टÑ व चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या साहित्य संमेलनाचे डॉ. श्रीपाल सबनीस उद्घाटन करणार असून, प्रमुख पाहुणे जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष रामदास फुटाणे उपस्थित राहणार आहेत.

दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे, संस्थापक-अध्यक्ष प्रा. चंद्रकुमार नलगे, आ. सुरेश खाडे, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष गणेश माळी यांनी दिली.
दक्षिण महाराष्टÑ साहित्यसभा व शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ या संस्था कार्यशाळा, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, साहित्य संमेलने या माध्यमातून कार्यरत आहेत. दक्षिण महाराष्टÑ साहित्य संमेलन मिरजेतील चिमण लोकूर साहित्य नगरी (बालगंधर्व नाट्यगृह) येथे होणार आहे.

संमेलनाचा प्रारंभ गणेश तलाव ते संमेलनस्थळापर्यंत ग्रंथ दिंडीने होणार आहे. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन, रामदास फुटाणे यांच्याहस्ते पुरस्कार वितरण व तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. यावेळी साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन, तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ‘अभिव्यक्ती व साहित्यिकांची जबाबदारी’ या विषयावर डॉ. बाबूराव गुरव यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादात डॉ. राजेंद्र कुंभार व प्रा. अविनाश सप्रे सहभागी होणार आहेत.
यावेळी दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभेचे उपाध्यक्ष भीमराव धुळूबुळू व शब्दांगण संस्थेचे अध्यक्ष नामदेव भोसले, बाबासाहेब आळतेकर उपस्थित होते.

'अनेक जिल्ह्यातील कवींचा सहभाग
श्रीराम पच्छिंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनात सांगली, कोल्हापूर, सोलापूर व सीमाभागातील कवी सहभागी होणार आहेत. महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार आहे. सायंकाळी ‘मोक्ष’ हे सांगली विभागीय राज्य नाट्य स्पर्धेतील परितोषक प्राप्त नाटक सादर करण्यात येणार आहे.

Web Title:  Inauguration of 'Chaitanya Vrangan Sahitya Sammelan' in Miraj, organized on Sunday: Shripal Sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.