खरसुंडीत कोविड सेंटरचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:19 AM2021-04-29T04:19:43+5:302021-04-29T04:19:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते श्रीनाथ डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते श्रीनाथ डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, काँग्रेस नेते जयदीप भोसले, पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, डॉ. गणेश यमगर, डॉ. उमेश पुजारी, भाजप ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष विलास काळेबाग, जयवंत सरगर, अर्जुन सावकार, राहुल गुरव, महादेव जुगदर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आमदार पडळकर म्हणाले की, आटपाडी तालुक्यातील कोरोना परिस्थिती गंभीर असून रोजचा तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शंभरी पार करत आहे. सांगली शहरापासून ९० किलोमीटर अंतर असलेल्या खरसुंडी गावात हे कोविड हेल्थ सेंटर झाल्याने कोरोना रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सेवा मिळणार आहे. या संकटकाळी सर्वांच्या सहकार्यांने योग्य सेवा कोविड रुग्णांना द्या त्यासाठी लागणारी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले .