मिरजेत जोतिराम मेथे कोविड सेंटरचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:24 AM2021-04-13T04:24:58+5:302021-04-13T04:24:58+5:30

मिरज : मिरजेतील बाजार समिती आवारातील शेतकरी भवन येथे डॉ. पृथ्वीराज मेथे यांच्या ब्रीदवेल हॉस्पिटल संचलित जाेतिराम मेथे मेमोरिअल ...

Inauguration of Mirjet Jotiram Methe Kovid Center | मिरजेत जोतिराम मेथे कोविड सेंटरचे उद्घाटन

मिरजेत जोतिराम मेथे कोविड सेंटरचे उद्घाटन

Next

मिरज : मिरजेतील बाजार समिती आवारातील शेतकरी भवन येथे डॉ. पृथ्वीराज मेथे यांच्या ब्रीदवेल हॉस्पिटल संचलित जाेतिराम मेथे मेमोरिअल कोविड सेंटरचे उद्घाटन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

येथे उपलब्ध सुविधांबाबत श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. पृथ्वीराज मेथे यांनी उपस्थितांना माहिती दिली. या कोविड केंद्राचा गरजू रुग्णांना नक्कीच लाभ होईल, असा विश्वास महापौर सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. यावेळी माजी उपमहापौर डॉ. राजेंद्र मेथे, संजय मेथे, प्रकाश सुरवसे, जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

मिरज आणि सांगलीसह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपचाराची साधने उपलब्ध होणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून मिरज येथील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. पृथ्वीराज मेथे यांनी कोविड सेंटर सुरू केले आहे. डॉ. मेथे यांचे ब्रिटव्हेल हॉस्पिटल हे नॉन कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहे. गतवर्षी कोरोना साथीच्या काळात डॉ. मेथे यांनी त्यांच्या रुग्णालयात आणि शहरातील विविध रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये शेकडो कोरोना रुग्णांवर उपचार केले आहेत. मिरजेतील बाजार समिती आवारातील शेतकरी भवन येथे सुरू केलेल्या कोविड केंद्रामध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथे ऑक्सिजनच्या ३७ खाटा उपलब्ध आहेत. रुग्णांवर उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचारी येथे असणार आहेत. डॉ. मेथे यांनी कोरोना साथीच्या काळात केलेल्या कार्याचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी केले. येथील कोविड केंद्राचा गरजू रुग्णांना नक्कीच लाभ होईल, असा विश्वास काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह उपस्थितांनी व्यक्त केला.

Web Title: Inauguration of Mirjet Jotiram Methe Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.