सांगलीत संविधान स्तंभाचे लोकार्पण; पालकमंत्र्यांसह आमदार, महापौरही उपस्थित

By श्रीनिवास नागे | Published: January 26, 2023 01:28 PM2023-01-26T13:28:28+5:302023-01-26T13:29:58+5:30

संविधान स्तंभाची उंची ५ फूट असून आणि व्यास अडीच फुटाचा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 

Inauguration of Constitution Pillar in Sangli | सांगलीत संविधान स्तंभाचे लोकार्पण; पालकमंत्र्यांसह आमदार, महापौरही उपस्थित

सांगलीत संविधान स्तंभाचे लोकार्पण; पालकमंत्र्यांसह आमदार, महापौरही उपस्थित

googlenewsNext

सांगली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. 

संविधान स्तंभ लोकार्पण समारंभास महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, जिल्हाज  नियोजन अधिकारी सरिता यादव उपस्थित होते.

संविधान स्तंभ बनविण्यासाठी ५२५ किलो ब्राँझ मटेरियलचा वापर करण्यात आला असून स्तंभाच्या मॉडेलला कला संचालनालयाची मान्यता घेण्यात आली आहे. संविधान स्तंभाची उंची ५ फूट असून आणि व्यास अडीच फुटाचा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 
या कार्यक्रमानंतर मिरज येथील परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महापालिका आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 21 हजार वह्यांचे वितरण पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Inauguration of Constitution Pillar in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.