‘संत सावता माळी बाजार’चे नेर्ले येथे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:51 AM2020-12-17T04:51:53+5:302020-12-17T04:51:53+5:30
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी योजनेअंतर्गत ‘संत सावता माळी रयत बाजार’चे उद्घाटन सरपंच छायाताई रोकडे ...
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी योजनेअंतर्गत ‘संत सावता माळी रयत बाजार’चे उद्घाटन सरपंच छायाताई रोकडे व तालुका कृषी अधिकारी बी. डी. माने यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी बी. डी. माने म्हणाले, शासनाच्या सावंता माळी रयत बाजारामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम शासन करणार आहे. या बाजारचे उद्घाटन बुधवारी नेर्ले येथे झाले. आतापर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला बाजारभाव मिळत नव्हता. त्यांचा माल मधलेच व्यापारी विकत घेत असत आणि नंतर तो ग्राहकाला विकत होते. परंतु या योजनेत शेतात पिकलेला माल त्यांच्या गावातील लोकांना थेट मिळणार आहे. त्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढणार आहे. या योजनेमुळे शेतकरी समृद्ध होईल, असा विश्वास वाटतो.
यावेळी मंडल अधिकारी डी. एल. बामणे, कृषी पर्यवेक्षक अर्जुन घाडगे, कृषी सहायक साधना अहिरे, कृषी सहायक एम. डी. रोकडे, कृषी सहायक स्वप्नील गिरी, तसेच उपसरपंच विश्वास पाटील, माजी सरपंच संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल साळुंखे, सविता माने, विजय पाटील, कृष्णाजी माने आदी उपस्थित होते.
कृषी सहायक साधना अहिरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
फोटो : १६ नेर्ले १
ओळ :
नेर्ले (ता. वाळवा) येथे संत सावता माळी रयत बाजारचे उद्घाटन सरपंच छायाताई राेकडे व तालुका कृषी अधिकारी बी. डी. माने यांच्याहस्ते करण्यात आले.
ओळ :
नेर्ले (ता. वाळवा) येथे संत सावता माळी रयत बझारचे उद्घाटन सरपंच छायाताई रोकडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संभाजी पाटील, उपसरपंच विश्वास पाटील उपस्थित हाेते.