रेठरे हरणाक्ष येथे विलगीकरण कक्षाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:18 AM2021-06-17T04:18:38+5:302021-06-17T04:18:38+5:30
रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे पोलीस उपनिरीक्षक नारायण देशमुख यांच्या हस्ते विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. चेतन ...
रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे पोलीस उपनिरीक्षक नारायण देशमुख यांच्या हस्ते विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. चेतन मोकाशी, बाळासाहेब कांबळे, जगन्नाथ मोरे-पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे पोलीस उपनिरीक्षक नारायण देशमुख यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. त्यामध्ये एकूण पाच बेड व दोन ऑक्सिजन सिलिंडरची सोय करण्यात आली आहे.
यावेळी सरपंच कुमार कांबळे, उपसरपंच नीलेश पवार, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जगन्नाथ मोरे, ग्रामविकास अधिकारी विलास यादव, वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन मोकाशी, डॉ. सुधीर जगताप, डॉ. भीमराव निकम, ग्रामपंचायत सदस्य - प्रेमनाथ गोदील, प्रदीप शिंदे, सुहास कोळेकर, समाज सेवक बाळासाहेब कांबळे, पोलीस पाटील सुखदेव वाकळे, आरोग्य कर्मचारी सचिन बेले, सुधीर मोरे उपस्थित होते.
कोट
विलगीकरण कक्षासाठी राष्ट्रवादीचे युवानेते प्रतीक पाटील यांनी पाच बेड, तर गावचे सुपुत्र पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत.
- डॉ. चेतन मोकाशी,
वैद्यकीय अधिकारी रेठरे हरणाक्ष.