तुंगच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:43 AM2021-05-05T04:43:25+5:302021-05-05T04:43:25+5:30
फोटो ओळ : कसबे डिग्रज : तुंग येथील नळ पाणीपुरवठाच्या अंतर्गत पाईपलाईनच्या उद्घाटन कार्यक्रमास आनंदराव नलवडे, भास्कर पाटील, माणिक ...
फोटो ओळ : कसबे डिग्रज : तुंग येथील नळ पाणीपुरवठाच्या अंतर्गत पाईपलाईनच्या उद्घाटन कार्यक्रमास आनंदराव नलवडे, भास्कर पाटील, माणिक पाटील, संजय शिंदे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : तुंग (ता. मिरज) येथील अंतर्गत नळपाणी पुरवठ्याच्या सुमारे साडेचार कोटींच्या पाइपलाईन कामाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आनंदराव नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कसबे डिग्रज येथून या पाईपलाईनच्या कामाची सुरुवात करण्यात आली. ही पाईपलाईन सुमारे सहा किलोमीटरची आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागातून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. कसबे डिग्रज- ब्रह्मनाळ-सुखवाडीच्या कृष्णा नदीतील डोहापासून हे पाणी तुंग गावासाठी नेण्यात येत आहे. यावेळी तुंगच्या सरपंच विमल सूर्यवंशी, उपसरपंच माणिक पाटील, भास्कर पाटील, विलास डांगे, दीपक यादव, सुरेश खबिले, कसबे डिग्रजचे उपसरपंच सागर चव्हाण, संदीप निकम, संजय शिंदे, प्रमोद चव्हाण, कुमार लोंढे आदी उपस्थित होते.