आष्ट्यात विलासराव शिंदे विलगीकरण कक्षाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:26 AM2021-05-24T04:26:23+5:302021-05-24T04:26:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : येथील बहूद्देशीय हॉल येथे शहरातील रुग्णासाठी स्वर्गीय विलासराव शिंदे विलगीकरण केंद्राचे उद्घाटन आष्टा शहर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील बहूद्देशीय हॉल येथे शहरातील रुग्णासाठी स्वर्गीय विलासराव शिंदे विलगीकरण केंद्राचे उद्घाटन आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांच्या हस्ते झाले. या केंद्रात ३० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष निगडी, जिल्हा नियोजन समिती सदस्य झुंजारराव पाटील, विशाल शिंदे, शैलेश सावंत, प्रकाश रुकडे, उद्योगपती नितीन झंवर, नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे उपस्थित होत्या.
वैभव शिंदे म्हणाले, विलगीकरण केंद्रात २० पुरुष व १० महिलासाठी व्यवस्था केली आहे. या कक्षामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत मिळेल.
दीक्षांत देशपांडे यांनी शासनाच्यावतीने सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी डॉ. प्रवीण कोळी, डॉ. प्रकाश आडमुठे, विजय मोरे, शेरनवाब देवळे, अर्जुन माने, सतीश माळी, राहुल थोटे, अनिल बोंडे, तेजश्री बोंडे, धैर्यशील शिंदे, सचिन मोरे उपस्थित होते.
चौकट
विलासराव शिंदे विलगीकरण कक्षात राहणाऱ्या नागरिकांना अल्पोपाहार व चहाची सोय शिवाजीराव पाटील आप्पा नागरी पतसंस्था व विलासराव शिंदे फाउंडेशन करणार आहेत तर वैद्यकीय सेवा ग्रामीण रुग्णालय व आष्टा डॉक्टर्स असोसिएशन देणार आहे.