रेठरेहरणाक्ष येथे विरंगुळा केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:26 AM2021-04-15T04:26:51+5:302021-04-15T04:26:51+5:30
रेठरेहरणाक्ष येथे आरोग्यसेवा गाडीचे लोकार्पण करताना, सर्जेराव यादव, अजिंक्य कुंभार, वैभव कांबळे, विठ्ठल पाटील, हिराबाई घेवदे आदी. लोकमत न्यूज ...
रेठरेहरणाक्ष येथे आरोग्यसेवा गाडीचे लोकार्पण करताना, सर्जेराव यादव, अजिंक्य कुंभार, वैभव कांबळे, विठ्ठल पाटील, हिराबाई घेवदे आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : गुढीपाडवा मुहूर्तावर रेठरेहरणाक्ष (ता.वाळवा) येथील पट्टे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्थेने गावातील गोरगरीब जनतेसाठी आरोग्यसेवा वाहन लोकवर्गणीतून उपलब्ध केले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा उद्योगपती सर्जेराव यादव यांच्याहस्ते करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उदघाटन तालुक्याचे सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वैभव कांबळे, अर्थक्रांती कडेगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील, सरपंच कुमार कांबळे, सर्जेराव यादव यांनी विरंगुळा केंद्रासाठी सहा सिमेंटची बाकडी भेट दिली.
यावेळी जगन्नाथ मोरे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मोरे यांनी यूज अँड थ्रोचे पन्नास गॅस सिलिंडर गावात कोविड पेशंटना मोफत भेट दिलेले आहेत. डी.के. मोरे, चंद्रशेखर मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मानले.
यावेळी निवास शिंदे, किसन सावंत, एन.डी. माने, निवृत्ती पवार, बाळासाहेब मदने, शहाजी सत्रे, वसंत पवार, पोपट बेले, भास्कर बेले, विलास माळी, मोहन काळे, बाळासाहेब कांबळे, दीपक गुरव, दादासाहेब कोळेकर, नितीन शिंदे, हुसेन अकोळकर, संपतराव शिंदे, दिनकर पवार, हिराबाई घेवदे उपस्थित होत्या.