Crime News Sangli: रागाचा नाही नेम, जिल्ह्यात सतत होतोय ‘गेम’; पोलिसांसमोर गुन्हेगारांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 04:38 PM2022-05-31T16:38:21+5:302022-05-31T16:39:35+5:30

किरकोळ कारणावरून खुनासारखे गंभीर प्रकार होत असल्याने या फाळकूटदादांना आता पोलिसी खाक्या दाखविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Incidents of murder and murderous attacks increased in Sangli district | Crime News Sangli: रागाचा नाही नेम, जिल्ह्यात सतत होतोय ‘गेम’; पोलिसांसमोर गुन्हेगारांचे आव्हान

Crime News Sangli: रागाचा नाही नेम, जिल्ह्यात सतत होतोय ‘गेम’; पोलिसांसमोर गुन्हेगारांचे आव्हान

Next

सांगली : नजरेला नजर मिळवणे आणि कोणाला मोठ्या आवाजात बोलले तरीही आता थेट त्याचा ‘गेम’ केला जात आहे. खून, खुनी हल्ल्याच्या घटनांनी जिल्हा पुरता हादरला आहे. पाच दिवसात सांगली शहरात दोन खुनाच्या घटना घडल्याने पोलिसांसमोर गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. किरकोळ कारणावरून खुनासारखे गंभीर प्रकार होत असल्याने या फाळकूटदादांना आता पोलिसी खाक्या दाखविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

रविवारी सायंकाळी सांगली शहरातील शंभरफुटी रस्त्यावर संतोष पवार या अंडाभुर्जी विक्रेत्याचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला. यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून या तरुणाला संपविण्यात आले. केवळ हल्लाच न करता त्याच्या अंडाभुर्जी गाडीचीही हल्लेखोरांनी ताेडफोड केली. रविवार सुटीचा दिवस आणि वर्दळ असतानाही संशयितांनी संतोषवर वार केला. गेल्याच आठवड्यात मंगळवारी रात्री मोठ्याने बोलण्यावरून झालेल्या वादावादीतून गुंड तुकाराम मोटेचा खून झाला होता. याप्रकरणी चार संशयितांपैकी एकावर वार झाल्याने त्यावर उपचार सुरू आहेत. तर अन्य तिघे अटकेत आहेत.

क्षणिक राग ठरतोय घातक

कोणतीही पूर्व वैमनस्य नसताना केवळ मोठ्याने का बोलता म्हणून हटकल्याने गुंड मोटे याचा खून करण्यात आला. यात क्षणिक रागातून तरुणांनी हे कृत्य केले. रविवारी खून झालेल्या संतोष पवार याच्यावर संशयितांनी एकच वार केला. यामागे त्यांची दहशत निर्माण करण्याचा उद्देश असावा मात्र, यात संतोषला प्राण गमवावे लागले.

वचक पडतोय कमी

शहरात फाळकूट दादांकडून वाढतच चाललेली दहशत सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. पोलीस ‘प्रतिबंधात्मक’ कारवाईपलीकडे जात नसल्याने या गुन्हेगारांचेही फावले आहे. त्यामुळे दमदाटी करणे, दहशत निर्माण करत मारहाणीचे प्रकार वाढले आहेत.

Web Title: Incidents of murder and murderous attacks increased in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.