कचरावेचक महिलांना कायमस्वरूपी कामात सामावून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:19 AM2021-02-05T07:19:49+5:302021-02-05T07:19:49+5:30

संजयनगर : कचरावेचक महिलाना कायमस्वरूपी शासकीय सेवेत काम मिळावे. या प्रमुख मागणीसाठी अवनी संस्थेतर्फे आमदार सुधीर गाडगीळ यांना निवेदन ...

Include waste pickers in permanent work | कचरावेचक महिलांना कायमस्वरूपी कामात सामावून घ्या

कचरावेचक महिलांना कायमस्वरूपी कामात सामावून घ्या

Next

संजयनगर : कचरावेचक महिलाना कायमस्वरूपी शासकीय सेवेत काम मिळावे. या प्रमुख मागणीसाठी अवनी संस्थेतर्फे आमदार सुधीर गाडगीळ यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे अवनी संस्था ही गेली २ वर्ष कचरावेचकांचे संघटन करित आहे. सांगली मिरज कुपवाडळ तीन शहरात मिळून ५०४ कचरावेचक महिला आहेत. या महिलाची परिस्थिती अत्यंत हालाकीची असून कोविड -१९ या आजारामुळे भंगार तसेच प्लॅस्टिकयुक्त कचरा त्या असुरक्षिततेच्या कारणामुळे जमा करु शकत नाहीत. त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. ८ एप्रिल २०१६ च्या कायद्यानुसार घनकचरा कायद्यानुसार सर्वेक्षण करून त्याना कचरा वर्गीकरणच्या कामात सामावून घ्यावे, असे निर्देश आहेत. अवनी संस्थेच्या वतीने या मुद्द्याचा आधार घेत दाेनवेळा या प्रश्नावर लेखी मागण्या केल्या आहेत. आता तरी या मागण्या गांभीर्याने घेऊन उपाययोजना कराव्यात व कचरावेचकांना दिलासा द्यावा.

सांगली शहरातील कचरावेचकांचे सर्वेक्षण करावे. त्यांना ओळखपत्र द्यावे. सहा महिन्यांपासून उद्भवलेल्या काेराेनाच्या संकटामुळे कचरावेचकांची परिस्थिती हालाखीची आहे. त्यांचे वीजबिल माफ व्हावे.

सध्या अवनीतर्फे कचरावेचकांचे आठ बचतगट तयार असून, त्यातील महिलांना शहरातील विविध भागांतील वर्गीकरणाचे काम द्यावे. शहरातील बचतगटांना मनेरेगा योजनेअंर्तगत जॉबकार्ड द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी सोनाली कांबळे व कचरावेचक महिला वैजंता गोसावी, स्मिता गायकवाड, शोभा मोरे, द्वारका कांबळे, सुनीता वाघमारे उपस्थित होत्या.

फोटो : २५ दुपटे १

ओळ : अवनी संस्थेतर्फे आमदार सुधीर गाडगीळ यांना कचरावेचक महिलांच्या प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले.

Web Title: Include waste pickers in permanent work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.