निर्यातक्षम द्राक्षांच्या अबकारीत वाढ : प्रतिकिलो ७० रुपये कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:26 PM2018-02-28T23:26:57+5:302018-02-28T23:26:57+5:30

सांगली : जिल्ह्यात उत्पादन होऊन बाहेरच्या देशात निर्यात होणाºया द्राक्षांसाठी प्रति किलोला तब्बल ५३ रुपये अबकारी करवाढ

 Increase in Exportable Grapes Abuse: Reverse Repo 70 rupees | निर्यातक्षम द्राक्षांच्या अबकारीत वाढ : प्रतिकिलो ७० रुपये कर

निर्यातक्षम द्राक्षांच्या अबकारीत वाढ : प्रतिकिलो ७० रुपये कर

Next
ठळक मुद्देविखे-पाटील यांच्यासह सतरा आमदारांची लक्षवेधी

सांगली : जिल्ह्यात उत्पादन होऊन बाहेरच्या देशात निर्यात होणाºया द्राक्षांसाठी प्रति किलोला तब्बल ५३ रुपये अबकारी करवाढ करण्यात आली आहे. अबकारी करातील वाढीमुळे ७० रुपयांपर्यंतचा कर द्यावा लागणार आहे. वाढलेल्या करामुळे व्यापाºयांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने उत्पादक अडचणीत आहेत.

यामुळे शेतकºयांना सोसाव्या लागणाºया अबकारी कराच्या बोजासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सतरा आमदारांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली आहे. लक्षवेधीनंतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडूनही याबाबतची माहिती मागविण्यात आली आहे. नैसर्गिक अवकृपा व दरातील चढउतारामुळे अगोदरच द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडला आहे.

या पार्श्वभूमीवर अबकारी करातील वाढीमुळे अडचणी वाढल्या आहेत. याबाबत विरोधी पक्षनेते विखे-पाटील, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, नसीम खान, अमीन पटेल, त्र्यंबक भिसे, वर्षा गायकवाड, अमर काळे, सुनिल केदार, अस्लम शेख, हर्षवर्धन सपकाळ, डॉ. संतोष टारफे, अब्दुल सत्तार, संग्राम थोपटे, राहुले बोंद्रे, भारत भालके, अ‍ॅड यशोमती ठाकूर यांनी लक्षवेधी मांडली आहे. द्राक्ष बागायतदारांची परिस्थिती लक्षात घेवून त्याबाबतची कार्यवाही शासनाने करावी यासाठीची ही लक्षवेधी असून, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडूनही त्याबाबत माहिती मागविण्यात आली आहे. आमदारांच्या लक्षवेधीमुळे सरकार बागायतदारांबाबत कोणता निर्णय घेणार याबाबतची उत्सुकता द्राक्ष बागायतदारांमध्ये आहे.

व्यापारी नसल्याने दर कोसळले
यंदा समाधानकारक द्राक्ष उत्पादन व चांगला माल असतानाही व्यापारी नसल्याने दर पडले आहेत. त्यात अबकारी करातील करवाढीमुळे शेतकरी चिंतेत आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५३ रुपयांची करवाढ शेतकºयांच्या माथ्यावर केंद्र सरकारने नवीन संकट आले आहे. आता सरकार काय निर्णय घेणार याकडे उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

Web Title:  Increase in Exportable Grapes Abuse: Reverse Repo 70 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.