जनसुराज्यचा जिल्ह्यात प्रभाव वाढवा

By admin | Published: August 20, 2016 11:13 PM2016-08-20T23:13:34+5:302016-08-20T23:16:08+5:30

विनय कोरे : सांगलीतील बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना

Increase the impact of Janasurajya district | जनसुराज्यचा जिल्ह्यात प्रभाव वाढवा

जनसुराज्यचा जिल्ह्यात प्रभाव वाढवा

Next

सांगली : जनसुराज्य शक्ती पक्षाचा जिल्ह्यात प्रभाव वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी वाढवा, लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवा. प्रशासन व लोकांमधील दुवा बनून लोकांचा विश्वास वाढवा, अशी सूचना पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांनी केली.
येथे आयोजित जनसुराज्य जिल्हा कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी स्वागत केले. यावेळी कोरे म्हणाले की, सरकार अपयशी ठरत असताना, लोकांनी विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न पडला आहे. जनसुराज्यकडे तरुणांची फळी आहे. कामातून पक्षाची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर आवाज उठवला पाहिजे. लोकांच्या आज शासनाकडून असलेल्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. त्यामुळे नागरिक पुन्हा पर्यायाचा शोध घेत आहेत. जनसुराज्यकडे असणाऱ्या तरुणांचा यासाठी उपयोग करुन सर्वांनी करुन घेतला पाहिजे. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्याची आज नितांत गरज बनली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, प्रभाकर सनमडीकर, संघटक शरद देशमुख, आनंद पाटील, युवा शक्ती जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष अतीश अग्रवाल, अ‍ॅड. प्रशांत पाटोळे, सुनील बंडगर, अमोल सातपुते, बाजार समिती संचालक देवराय बिरादार, सुधाकर माळी, एम. के. पुजारी यांच्यासह पदाधिकराी कार्यकर्ते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

आंदोलने उभी करा
नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनातून आवाज उठवा. शहर, गावातील प्रश्न समजून घेऊन त्याची सोडवणूक करा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जनसुराज्यचा प्रभाव वाढवण्यासाठी त्याचे नियोजनात्मक संघटन वाढवा, असे आवाहन माजीमंत्री विनय कोरे यांनी बैठकीत केले. यासाठी आतापासून कामाला लागावे. जनतेचे प्रबोधन हे आपले कामच आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Increase the impact of Janasurajya district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.