वाहन नोंदणीसाठी शुल्कात मोठी वाढ, आजपासून नवे दर लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 08:06 AM2022-04-01T08:06:08+5:302022-04-01T08:07:00+5:30
दुचाकीच्या जुन्या नोंदणीचे नूतनीकरण ३०० वरून एक हजार
सांगली : वाहन नोंदणी शुल्कात मोठी वाढ करण्यात आली असून नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. जुन्या वाहनांचे नूतनीकरण व १५ वर्षांवरील वाहनांच्या फीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
दुचाकीच्या जुन्या नोंदणीचे नूतनीकरण ३०० वरून एक हजार, तीन चाकीचे नूतनीकरण ६०० वरून २,५०० तर हलकी मोटार (एलएमव्ही) नूतनीकरण फी ३०० वरून थेट ५ हजार होणार आहे. अन्य वाहनांची नवीन नोंदणी २०० वरून ३ हजार, जुन्या नोंदणीचे नूतनीकरण २०० वरून ६ हजार रुपये झाले आहे. नवीन कायद्यानुसार १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने वापरणे त्रासदायकच ठरणार आहे. या वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्र किंवा नूतनीकरण शुल्कात वाढ झाली आहे.