जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; १११० नवे रुग्ण, २१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:18 AM2021-07-19T04:18:31+5:302021-07-19T04:18:31+5:30

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत रविवारी पुन्हा एकदा वाढ झाली. दिवसभरात १११० नवे रुग्ण आढळून आले, तसेच ...

Increase in the number of corona patients in the district; 1110 new patients, 21 deaths | जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; १११० नवे रुग्ण, २१ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; १११० नवे रुग्ण, २१ जणांचा मृत्यू

Next

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत रविवारी पुन्हा एकदा वाढ झाली. दिवसभरात १११० नवे रुग्ण आढळून आले, तसेच परजिल्ह्यातील दोघांसह जिल्ह्यातील १९ जणांंचा मृत्यू झाला. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण पुन्हा घटले असून ९५७ जण कोरोनामुक्त झाले.

एरवी रविवारी आठवड्यातील सर्वांत कमी रुग्णांची नोंद होते. मात्र, शनिवारपेक्षा रुग्णसंख्या वाढली आहे. जिल्ह्यातील १९ जणांचा मृत्यू झाला असून सांगली, मिरज आणि कुपवाडमध्ये प्रत्येकी एक, वाळवा तालुक्यात ७, तासगाव, शिराळा आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी २, कडेगाव, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

रविवारी आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआरअंतर्गत ४८१९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ५९४ जण बाधित आढळले. तर रॅपिड अँटिजनच्या ८४६५ जणांच्या नमुने तपासणीतून ५४२ जणांचे निदान झाले.

उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्या वाढत असून सध्या १० हजार ६४१ जण उपचार घेत असून यातील १०५९ जणांची चिंताजनक आहे. यातील ९०६ जण ऑक्सिजनवर तर १५३ जण व्हेंटीलिटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू तर नवे २६ जण उपचारास दाखल झाले.

चाैकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १६४६४६

उपचार घेत असलेले १०६४१

कोरोनामुक्त झालेले १४९६१०

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४३९५

रविवारी दिवसभरात

सांगली १७४

मिरज ३६

आटपाडी ९९

कडेगाव ९२

खानापूर ९१

पलूस ९०

तासगाव ११०

जत ३५

कवठेमहांकाळ ९२

मिरज ११२

शिराळा ३३

वाळवा १४६

Web Title: Increase in the number of corona patients in the district; 1110 new patients, 21 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.