जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:20 AM2021-01-10T04:20:05+5:302021-01-10T04:20:05+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी वाढ झाली. दिवसभरात २५ जणांना कोरोनाचे निदान होताना २१ जण कोरोनामुक्त झाले. सलग ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी वाढ झाली. दिवसभरात २५ जणांना कोरोनाचे निदान होताना २१ जण कोरोनामुक्त झाले. सलग पाचव्या दिवशी कोरोनाने एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
शुक्रवारी १३ नव्या रुग्णांची नोंद झाली असताना शनिवारी त्यात वाढ झाली. तरीही आकडेवारी नियंत्रणात आहे. मिरज शहरासह जिल्ह्यातील पलूस, मिरज आणि शिराळा तालुक्यांत एकही नवीन कोरोनाबाधित आढळला नाही.
जिल्ह्यातील सहा रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या २०७ रुग्णांपैकी ५० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४३ जण ऑक्सिजनवर तर सातजण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य यंत्रणेच्या वतीने आरटीपीसीआरअंतर्गत २३८ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात १६ जण पॉझिटिव्ह आढळले; तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ७४२ चाचण्यांमधून १० जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७७७१
उपचार घेत असलेले २०७
कोरोनामुक्त झालेले ४५८२९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७३५
शनिवारी दिवसभरात
सांगली ३
जत ८
खानापूर ७
कडेगाव ३
आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, वाळवा प्रत्येकी १