कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; १५ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:22 AM2020-12-26T04:22:45+5:302020-12-26T04:22:45+5:30
चार दिवसांपासून सर्वांत कमी बाधितांची नाेंद झाली होती. त्यात दहाने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले तरीही खानापूर, कवठेमहांकाळ, वाळवा तालुक्यात ...
चार दिवसांपासून सर्वांत कमी बाधितांची नाेंद झाली होती. त्यात दहाने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले तरीही खानापूर, कवठेमहांकाळ, वाळवा तालुक्यात एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. मिरज शहरातही एकही रुग्ण आढळलेला नाही.
आरोग्य विभागाच्यावतीने शुक्रवारी आरटीपीसीआरअंतर्गत २६२ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात १३जण बाधित आढळले, तर रॅपिड ॲन्टिजेन टेस्टमध्ये ६६१ जणांच्या नमुने तपासणीतून १२ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
सध्या उपचार घेत असलेल्या १९४ रुग्णांपैकी ४१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर रुग्णांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. यातील ३३ जण ऑक्सिजनवर, तर ८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७४७५
उपचार घेत असलेले १९४
कोरोनामुक्त झालेले ४५५५४
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७२७
शुक्रवारी दिवसभरात
सांगली, आटपाडी, जत प्रत्येकी ६
तासगाव २
कडेगाव, शिराळा, पलूस प्रत्येकी १