जिल्ह्यात कोरोना चाचण्यांसह रुग्णसंख्येतही वाढ; पॉझिटिव्हिटी दर २५ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:27 AM2021-05-06T04:27:17+5:302021-05-06T04:27:17+5:30
सांगली : महिन्याभरापूर्वी पूर्णपणे नियंत्रणात असलेली जिल्ह्यातील कोरोनास्थितीत झपाट्याने वाढ होत अहे. बाधितांचे प्रमाण दिवसाला दीड हजारावर पोहोचले असताना ...
सांगली : महिन्याभरापूर्वी पूर्णपणे नियंत्रणात असलेली जिल्ह्यातील कोरोनास्थितीत झपाट्याने वाढ होत अहे. बाधितांचे प्रमाण दिवसाला दीड हजारावर पोहोचले असताना पॉझिटिव्हिटी दरही २५ टक्क्यांवर पोहोचला आहे. अधिक गतीने बाधितांचे निदान होऊन त्यांच्या उपचाराचे नियोजन करता यावे यासाठी प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाणही वाढविले आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात बाधितांची संख्या सरासरी २०० वर कायम होती. महिनाभरात ही परिस्थिती अधिकच गंभीर बनताना आता दीड हजारावर रुग्ण आढळून येत आहेत.
बाधितांचे प्रमाण वाढले अथवा कमी झाले तरीही प्रशासनाने सुरुवातीपासूनच चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. रॅपिड ॲन्टिजेनसह आरटीपीसीआर अंतर्गतही चाचण्या वाढविल्या आहेत. तरीही बाधितांचे टक्केवारी चिंताजनक आहे. १ एप्रिल रोजी पॉझिटिव्हिटी दर १४.२९ होता; तर तोच १ मे रोजी २७.०९ टक्क्यांवर पोहोचला आहे. महिनाभरात चाचण्यांत तीन हजारांनी वाढ झाली असून सध्या सरासरी पाच हजार चाचण्या केल्या जात आहेत.
चौकट
आरटीपीसीआर, ॲन्टिजेनमध्येही बाधितांचे प्रमाण समानच
१) तातडीच्या निदानासाठी रॅपिड ॲन्टिजेन चाचणी केली जाते तर अचूक निदानासाठी आरटीपीसीआर चाचणीवर जास्त मदार आहे. दोन्ही चाचण्यांमुळे बाधितांस लवकर उपचारास मदत होत आहे.
२) महिन्याभरातील दोन्ही चाचण्यांचे पॉझिटिव्हचे प्रमाण समान असले तरी रॅपिड ॲन्टिजेनमधून अधिक बाधित आढळले आहेत. त्यानंतर यातील अनेकजण आरटीपीसीआर चाचणीही करून घेत आहेत.
चौकट
ग्रामीण भागातही टेस्टिंग वाढवले
* महिन्याभरापूर्वी जिल्ह्यातील कोरोनास्थिती नियंत्रणात येईल अशी स्थिती होती. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाणही मोजकेच होते. टेस्टिंगसाठी सर्वत्र सोय असली तरी चाचण्यांचे प्रमाण शहरात जास्त होते.
* आता तालुकापातळीवर आणि शासकीय रुग्णालयात प्रशासनाने टेस्टिंगचे प्रमाण वाढविले आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बाधितांची वाढती संख्या समोर येत आहे.
* सध्या करण्यात येत असलेल्या चाचण्यांमधून ग्रामीण भागातील रुग्णांची अधिक संख्या आढळून येत आहेत.
कोट
आरोग्य यंत्रणेस अधिकाधिक चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. बाधिताचे लवकर निदान झाल्यास त्याला उपचार करणे सुलभ हाेत असल्याने चाचण्या वाढविण्यात येत आहेत.
- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी
चौकट
दि चाचणी संख्या रुग्ण संख्या पॉझिटिव्हिटी दर
१ एप्रिल १९३१ २७६ १४
८ एप्रिल २९२२ ४०५ १३
१५ एप्रिल ४०९९ ९२१ २२
२१ एप्रिल ४६०६ १११६ २४
२८ एप्रिल ५१४३ १३६३ २६
१ मे ४८९८ १३२७ २७
२ मे ४५७६ १३३८ २९
३ मे ५२२७ १५६८ २९
४ मे ५७७९ १५७५ २७