सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 02:41 PM2018-12-28T14:41:00+5:302018-12-28T14:44:28+5:30
निर्माल्य, कचऱ्याचे ढीग, सांडपाण्याचा प्रवाह अशा अनेक कारणांनी सांगलीच्या कृष्णा नदीपात्रातील प्रदूषण वाढले आहे.
सांगली : निर्माल्य, कचऱ्याचे ढीग, सांडपाण्याचा प्रवाह अशा अनेक कारणांनी सांगलीच्या कृष्णा नदीपात्रातीलप्रदूषण वाढले आहे.
नदीस्वच्छतेच्या कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढतच आहे. वेगवगळ्या पानवनस्पतींचा थर याठिकाणी निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत आहे. शोरीनाल्यातून दररोज कोट्यवधी लिटर सांडपाणी नदीत मिसळत आहे.
कारखान्यांमधील पाण्यावर प्रक्रिया न करताच ते नदीमध्ये सोडले आहे. वास्तविक रासायनिक कारखान्यांमधील पाण्यावर एमआयडीसीतील जलप्रक्रिया केंद्रामध्ये प्रक्रिया करणे आवश्यक आहे. प्रक्रिया केलेले पाणी नदीमध्ये सोडताना त्याचे परीक्षण करणे आवश्यक आहे. पण अनेक वेळा कारखान्यांमधील पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे.
नदीचे पात्र काळे झाले असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकेकाळी या परिसरातील जीवनदायी असलेल्या कासाडीचे नाल्यात रूपांतर होवू लागले आहे. मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. नदीमधील प्रदूषण थांबविण्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका व एमआयडीसी सर्वच दुर्लक्ष करत आहेत.