अनलाॅक काळात रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:03 AM2020-12-05T05:03:35+5:302020-12-05T05:03:35+5:30

नागपूर विभागातून कोळसा, कापूस हस्क, कापूस बियाणे, तेल, तांदूळ, भुसावळ विभागात हस्क, पुणे विभागात कृषी आधारित खते वाहतूक करुन ...

Increase in railway freight during unlock period | अनलाॅक काळात रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ

अनलाॅक काळात रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ

Next

नागपूर विभागातून कोळसा, कापूस हस्क, कापूस बियाणे, तेल, तांदूळ, भुसावळ विभागात हस्क, पुणे विभागात कृषी आधारित खते वाहतूक करुन रेल्वेने व्यवसाय मिळविला आहे. यावर्षी मध्य रेल्वेकडून ऑटोमोबाईल लोडिंग १५५ रॅकपर्यंत पोहोचली आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२० मध्ये बांगला देशात विविध टर्मिनल्स व वाहनांची निर्यात करण्यात आली. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या कालावधित कांद्याच्या १८२ रॅक्स पाठविण्यात आल्या. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात कृषी वाहतूक करण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये मुंबई विभागाने एका दिवसात १,२५२ वॅगन भरुन सर्वाधिक लोडिंगचा विक्रम केला. भुसावळ विभागाने ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक २१ गाड्यांची नोंद केली.

किसान रेल्वेस शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. किसान रेल्वेने आतापर्यंत ४१ फेऱ्यांत १३,५१३ टन कृषिमाल व इतर वस्तूंची वाहतूक केली आहे. जेऊर स्थानकातून प्रथमच २३ टन केळी भरण्यात आली. कोविड कालावधित आतापर्यंत ६४९ पार्सल गाड्या चालविण्यात आल्या आहेत. भिवंडी, पंढरपूर, सांगोला, बेलवंडी, कोपरगाव, मोडलिंब, जेऊर, लासलगाव, वरुड ऑरेंज सिटी, काटोल, पांढुर्णा, नरखेर व कळमेश्वर स्थानकांवरही पार्सल वाहतुकीस शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे.

Web Title: Increase in railway freight during unlock period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.