सिध्देवाडीच्या उपसरपंचपदी इंदाबाई शिनगारे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:47+5:302021-06-22T04:18:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मालगाव : सिध्देवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी इंदाबाई शिनगारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मालगाव : सिध्देवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी इंदाबाई शिनगारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सागर माने यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने नूतन उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली.
सिध्देवाडी ग्रामपंचायतीवर महावीर खोत व दादा धडस गटाची सत्ता आहे. या गटातून उपसरपंच पदासाठी इंदाबाई शिनगारे यांचा एकमेव अर्ज दाखल होता. सरपंच रामचंद्र वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत इंदाबाई शिनगारे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीने ग्रामपंचायतीवर खोत व धडस गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे. शिनगारे यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाके उडवून आनंद व्यक्त केला. या निवडीबद्दल सरपंच रामचंद्र वाघमोडे, महावीर खोत, दादासाहेब धडस, ढवळीचे ग्रामविकास अधिकारी सुनील गरंडे यांनी शिनगारे यांचा सत्कार केला. यावेळी सागर माने, अशोक गरंडे, बाळासाहेब व्हनमिसे, प्रतिमेश कुरणे यांच्यासह महिला सदस्य तसेच पोपट शिनगारे, बंडू खरात, ग्रामविकास अधिकारी विनायक मोरे, आनंदा एडके, प्रकाश नाईक उपस्थित होते.
चौकट
विरोधकांची सोडली साथ!
गत काही निवडणुकीत विरोधकांनी महावीर खोत व दादासाहेब धडस या गटात फूट पाडून उपसरपंचपदाची निवडणूक हातात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो खोत व धडस यांनी हाणून पाडला. सदस्यांनी विरोधकांची साथ सोडून गट एकसंघ ठेवल्यामुळे उपसरपंच निवडीत विरोधकांचा मागमूसही दिसला नाही.