सांगलीत स्वतंत्र एनडीआरएफचा कॅम्प उभारावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:30 AM2021-08-12T04:30:14+5:302021-08-12T04:30:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या पंधरा वर्षांत सांगली जिल्ह्याला तीनवेळा महापुराचा फटका बसला आहे. लाखो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेल्या पंधरा वर्षांत सांगली जिल्ह्याला तीनवेळा महापुराचा फटका बसला आहे. लाखो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी सांगलीला स्वतंत्र एनडीआरएफचा कॅम्प उभारावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली.
याबाबत जिल्हाधिकारी डाॅ. अभिजीत चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दिगंबर जाधव, रावसाहेब घेवारे, जितेंद्र शहा, सचिन कांबळे, लक्ष्मण वडर, अनिल शेटे, मानसी शहा, प्रभाकर कुरळपकर, प्रसाद रिसवडे, सनत पाटील, सुशांत मधाळे, संतोष पाटील उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र महापालिकेत आहे. त्यामुळे सांगलीत एनडीआरएफ व एसडीआरएफचे दोन स्वतंत्र कॅम्प मंजूर होण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. उत्तर कर्नाटक, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांसाठी सांगली हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या परिसरात नैसर्गिक आपत्ती आल्यास तत्काळ एनडीआरएफचे पथक नागरिकांच्या मदतीला पोहोचू शकते. मध्यप्रदेश सरकारने प्रत्येक जिल्ह्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन दल स्थापन केले आहे. त्या धर्तीवर राज्यातही असे दल नियुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली.