आंतरराष्टय पातळीवर शस्त्र सज्जतेत भारत सक्षम :-जयंत पेंडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:49 PM2019-07-26T23:49:41+5:302019-07-26T23:50:19+5:30

शत्रूराष्ट्राची दाणादाण उडवण्याची ताकद आपल्या देशातील लष्करात आहे. त्यामुळे आता देशातील नागरिकांनीही एकसंध राहावे.

 India capable of equipping arms at international level | आंतरराष्टय पातळीवर शस्त्र सज्जतेत भारत सक्षम :-जयंत पेंडसे

सांगलीत शुक्रवारी निवृत्त कर्नल जयंत पेंडसे यांनी मार्गदर्शन केले.

Next
ठळक मुद्देकारगील विजय दिनानिमित्त सांगलीमध्ये व्याख्यान

सांगली : अण्वस्त्रांच्या बाबतीत आंतरराष्टय पातळीवर अमेरिकेनंतर आपल्या देशाचे नाव आहे. मात्र त्याच्या वापराला अनेक मर्यादा आहेत. आंतरराष्टय पातळीवरील नियमावलीमुळे त्याचा वापर करता येत नाही. त्यात आंतरराष्ट्रीय समुदायात आपल्या देशाने पत कायम राखली आहे. तरीही आंतरराष्टय पातळीवर शस्त्र सज्जतेत आपला देश अधिक सक्षम आहे, असे प्रतिपादन निवृत्त कर्नल जयंत पेंडसे यांनी शुक्रवारी सांगलीत केले.

येथील विलिंग्डन महाविद्यालयात कारगील विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पेंडसे बोलत होते. अध्यक्षस्थानी रामकृष्ण पटवर्धन होते. पेंडसे म्हणाले, राष्टय एकतेची भावना अलीकडील काळात कमी होत असताना सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांप्रतीही संवेदनशीलता कमी होत असल्याची खंत आहे. शत्रूराष्ट्राची दाणादाण उडवण्याची ताकद आपल्या देशातील लष्करात आहे. त्यामुळे आता देशातील नागरिकांनीही एकसंध राहावे. कारगील युध्दात प्रत्यक्ष सहभागी नसलो तरी नजीकच्या पूँछ, राजौरी भागात आम्ही पाकिस्तानशी संघर्षाच्या तयारीत होतो.

प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी स्वागत केले. यावेळी आर. एस. पोंदे, उपप्राचार्य जे. बी. देशपांडे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

सैनिक कुटुंबीयांप्रती आदर हवा
पेंडसे म्हणाले, सैनिकांच्या कुटुंबीयांप्रतीही समाजात आदराची भावना असली पाहिजे. त्यामुळे त्यांनाही नागरिकांनी आदर दिला पाहिजे. त्यामुळे सैनिकांना देशसेवेची प्रेरणा मिळेल.

 

Web Title:  India capable of equipping arms at international level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.