दिव्यांग शिक्षक, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:26 AM2021-01-23T04:26:29+5:302021-01-23T04:26:29+5:30
सांगली : दिव्यांग शिक्षक व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. कास्ट्राईब दिव्यांग विभाग शिक्षक ...
सांगली : दिव्यांग शिक्षक व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. कास्ट्राईब दिव्यांग विभाग शिक्षक व कर्मचारी संघटनेने यासाठी २० जानेवारीस मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. आंदोलकांनी सांगितले की, इतर कर्मचाऱ्यांना २०१६ पासून वेतन आयोग लागू केला, पण आम्हाला मात्र डावलण्यात आले. अन्य ३४ मागण्यांकडेही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. सामाजिक न्याय विभाग व व समाजकल्याण आयुक्तांच्या समन्वयाने यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष तुषार भालेराव यांनी व्यक्त केली. आंदोलनात पुणे विभागीय कार्याध्यक्ष संजय चव्हाण यांच्यासह सांगली जिल्हाध्यक्ष अनिल राजामाने, रोहन भंडारे, विजय साळे, दिनेश गडवीर, विजय पाटील, प्रवीण कांबळे आदी सहभागी झाले.
-------