बिळाशीत तिरंगी लढतीचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:25 AM2020-12-22T04:25:51+5:302020-12-22T04:25:51+5:30
बिळाशी ग्रामपंचायतीत अकरा सदस्य आहेत. गतवेळी राष्ट्रवादीचे चार, सत्यजित देशमुख गटाचे चार, तर शिवाजीराव नाईक गट तीन असा समझोता ...
बिळाशी ग्रामपंचायतीत अकरा सदस्य आहेत. गतवेळी राष्ट्रवादीचे चार, सत्यजित देशमुख गटाचे चार, तर शिवाजीराव नाईक गट तीन असा समझोता झाला होता. सरपंचपद दोन वर्षे काँग्रेस, तीन वर्षे राष्ट्रवादी, तर उपसरपंचपद शिवाजीराव नाईक गटाकडे होते. परंतु, समझोता एक्सप्रेस बिघडत गेली आणि राजीनामा देण्यास विलंब होणे व उपसरपंच पदावेळी पक्षांतर्गत अर्ज भरण्याच्या कुरघोड्यांमुळे वातावरण दूषित झाले.
सध्या भाजपचे विजय रोकडे, तसेच पी. आर. पोतदार, माजी उपसरपंच संभाजी लोहार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. शिवाजीराव नाईक गट व देशमुख गट एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद वाढली असली तरी एकत्रित येऊन लढण्याची मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये नाही. त्यामुळे राष्ट्रवादी, सत्यजित देशमुख गट व भाजप अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
चाैकट -
सत्तेचे सूत्र
सध्या गावच्या विकासाबद्दल व्हॉट्सॲपवर आक्रमकपणे चर्चा सुरू असल्या तरी लोकांमध्ये नाराजी आहे. कोणाशी कोणाची युती होते, यावरच ग्रामपंचायतीची सत्ता कोणाच्या हातात जाईल, हे ठरणार आहे.