‘इंद्रजित’चा ऐरावत ‘कृष्णा’च्या डोहात

By admin | Published: July 7, 2015 11:37 PM2015-07-07T23:37:58+5:302015-07-07T23:37:58+5:30

संस्थापक पॅनेलमध्ये अजूनही धुगधुगी : पराभवानंतर ‘रयत’वर आत्मपरीक्षणाची वेळ

'Indrajeet's Aaravat' in Krishna's Dove | ‘इंद्रजित’चा ऐरावत ‘कृष्णा’च्या डोहात

‘इंद्रजित’चा ऐरावत ‘कृष्णा’च्या डोहात

Next

अशोक पाटील - इस्लामपूर -कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते यांच्याविरोधात रयत पॅनेलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनी जोरात तयारी केली होती, परंतु अचानक सक्रिय झालेले मदन मोहिते यांच्या आडमुठ्या धोरणामुळे ‘इंद्रजित’चा ऐरावत कृष्णाच्या डोहात साफ बुडाला. दुसरीकडे सहकार पॅनेलने मुसंडी मारून संस्थापक पॅनेलला गारद केले असले तरी, स्वत: अविनाश मोहिते आणि त्यांचे पाच संचालक निवडून आल्याने या पॅनेलमध्ये अजूनही धुगधुगी आहे.
कृष्णा कारखान्याची निवडणूक लागण्यापूर्वीच डॉ. इंद्रजित मोहिते यांनी रयत पॅनेलच्या माध्यमातून वातावरण निर्माण केले होते. वर्षभरापासून त्यांनी सभासदांशी संपर्क ठेवून आपले म्हणणे पटवून देण्यास सुरुवात केली होती. त्यांचे बंधू मदन मोहिते यांनी स्वत:ची ताकद अजमावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरुवातीला स्वतंत्र पॅनेल उभे करून निवडणूक लढविण्याबाबत प्रयत्न केले. परंतु अंतिम टप्प्यात काँग्रेसच्या नेत्यांनी इंद्रजित व मदन मोहिते यांच्यामध्ये समेट घडवत रयत पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यास भाग पाडले. मात्र मदन मोहिते यांच्या आडमुठ्या धोरणामुळे सभासदांनी दोघांसह संपूर्ण पॅनेललाच सपशेल नाकारल्याचे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी वेगळ्या संस्था निर्माण करू, कारखाना उभा करू, अशा वल्गना करून पराभवावर पांघरुण घालण्याचे काम सुरू केले आहे.
या निवडणुकीत सहकार व रयत पॅनेलला संस्थापक पॅनेलने कडवी झुंज दिली. सभासदांचा कौल संस्थापक पॅनेलच्या बाजूने असल्याचे वातावरण होते, परंतु डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलच्या साम-दाम-दंड-भेद नीतीपुढे अविनाश मोहिते यांचेही चालले नाही. त्यांचे उमेदवार अल्पमतांच्या फरकाने पराभूत झाले. त्यामुळे संस्थापक पॅनेलमध्ये अजूनही धुगधुगी आहे. याच ताकदीवर त्यांनी मंगळवारी कऱ्हाड येथे सभासदांचा आभार मेळावाही घेतला.

निवडणुकीत विरोधकांनी खोटे-नाटे आरोप करून आमच्याविरोधात वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केला, पण सभासदांनी संस्थापक पॅनेलला दिलेला कौल चांगलाच आहे. आमचे उमेदवार अत्यल्प मताने पडले आहेत. कारखान्यात चुकीचे काही घडत असल्यास त्याला आम्ही ठामपणे विरोध करू. आम्ही फेरमतमोजणीची मागणी केली आहे.
- अविनाश मोहिते, माजी अध्यक्ष कृष्णा कारखाना.

Web Title: 'Indrajeet's Aaravat' in Krishna's Dove

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.