इंद्रजित मोहिते यांचा प्रचाराचा नवीन खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:34 AM2021-02-27T04:34:05+5:302021-02-27T04:34:05+5:30
डॉ. इंद्रजित मोहिते, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कृष्णेची निवडणूक दिवाळी अगोदर ...
डॉ. इंद्रजित मोहिते, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णेची निवडणूक दिवाळी अगोदर होण्याची शक्यता आहे. रयत पॅनलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा उडविला आहे. सातारा, सांगली जिल्ह्यातील मंत्री सहकार चळवळीबरोबर आहेत. सत्ताधारी सहकार आणि संस्थापक पॅनलचे नेते सहकार चळवळीच्या विरोधात असल्याचा आरोप डॉ. इंद्रजित मोहिते यांनी करून प्रचाराचा नवीन फंडा सुरू केला आहे.
कोरोनामुळे पुन्हा एकदा यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा रयत पॅनलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते यांनी कृष्णेचा इतिहास सभासदांपुढे सोशल मीडियावर मांडत आहेत. महाआघाडीतील काही मंत्र्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नावे न घेता (माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि राज्य सहकार मंत्री विश्वजित कदम) यांची सहकार चळवळीवर निष्ठा आहे. खासगीकरणाला विरोध आहे, असा प्रचाराचा नवीन फंडा आणला असून, कृष्णा कारखाना खासगीकरण आणि भ्रष्टाचारातून मुक्त करावा, असा प्रचार सुरू केला आहे.
डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले, येणारा काळ औद्योगिक उत्पन्न आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचार करणे गरजेचे असताना काही नेते सहकार चळवळीला राजकीय कल देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील ७० वर्षांतील तीन पिढ्यांतील नेत्यांनी शेती आणि शेतकऱ्यांची बाजू धरल्याची भुमिका पत्करली आहे. वारणा, कृष्णा खोऱ्यातील काही माजी मुख्यमंत्री मंत्रिमंडळातील दोन व तीन नंबरचे मंत्री, पक्षांचे अध्यक्ष, काही आमदार हे शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडत आहेत. परंतु काही अफवा पसरून आपला स्वार्थ साधत असल्याचा आरोप मोहिते यांनी केला आहे.
चौकट
इतिहासाला उजाळा
यापूूर्वी कृष्णेच्या उद्योग समूहात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासमवेत असलेले फोटो डॉ. इंद्रजित मोहिते सोशल मीडियावर टाकत इतिहासाला उजाळा देत आहेत. हे नेते सहकार चळवळीच्या पाठीशी असल्याचा सभासदांना पुरावा देत आाहेत.