अधिकाºयांना पोसण्याचा उद्योग : सांगली महासभेत आरोप-डेंग्यू, चिकुनगुन्यावरून अधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:00 AM2017-12-19T00:00:43+5:302017-12-19T00:02:19+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रात डेंग्यू, चिकुनगुन्याची साथ असताना आरोग्य विभाग झोपा काढतो आहे. कुणाला काय अधिकार आहेत, हेच माहीत नाही.
सांगली : महापालिका क्षेत्रात डेंग्यू, चिकुनगुन्याची साथ असताना आरोग्य विभाग झोपा काढतो आहे. कुणाला काय अधिकार आहेत, हेच माहीत नाही. सहायक आरोग्याधिकाºयांना हटविण्याचा ठराव केला असतानाही त्यांना पोसण्याचा उद्योग कशासाठी? असा संतप्त सवाल सोमवारी महासभेत केला.
महापौर हारुण शिकलगार यांना आरोग्याच्या विषयावर बुधवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
महापालिकेची तहकूब सभा सोमवारी झाली. अश्विनी खंडागळे यांनी डेंग्यू, चिकुनगुन्यावर काय उपाययोजना केल्या, असा प्रश्न केला. त्यावर सहायक आरोग्याधिकारी संजय कवठेकर यांनी डेंग्यूचे ४९ संशयित व चिकुनगुन्याचे ४० संशयित आढळले असून, प्रत्येकी सहाजण पॉझिटीव्ह आहे. ठिकठिकाणी औषध फवारणी करण्यात आल्याचा खुलासा केला. पण, त्याला सुरेश आवटी यांनी आक्षेप घेतला. चारही सहायक आरोग्याधिकाºयांना हटविण्याच्या ठरावावर अंमलबजावणी का केली नाही? आरोग्याधिकाºयांचे कोणी ऐकत नाहीत. त्यांना काहीच अनुभव नाही. कुणाला काय अधिकार दिले आहेत याची माहितीच नाही. मग नेमका अधिकार कुणाला? अखेर महापौरांनी या विषयावर बुधवारी प्रशासनासोबत बैठक घेण्याची हमी दिली.
...तर मी राजीनामा देतो : खोत
सभेत धनपाल खोत यांनी मुकादम, स्वच्छता निरीक्षकांवर गंभीर आरोप केले. हजेरी शेडवर सकाळी मुकादम, स्वच्छता निरीक्षक हजर नसतात. त्यांच्याऐवजी बोगस व्यक्ती उपस्थित असतो. तोच कर्मचाºयांची हजेरी मांडतो. हजेरीपत्रकावर त्यांच्या सह्या आहेत का? ते तपासा. सत्य उघड होईल. यात काही खोटे असेल तर, मी नगरसेवकपदाचा राजीनामा देतो, असे जाहीर आव्हान दिले, तर संतोष पाटील यांनी घंटागाडीवर लहान मुलांना कामाला लावले जात आहे. सोशल मीडियावर तशी छायाचित्रे आली आहेत, असा आरोप केला.
व्हिडिओ गेमचे परवाने रद्द
महापालिका हद्दीत व्हिडिओ गेमचे प्रस्थ वाढले आहे. त्यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. यासाठी महापालिकेकडून परवाने दिले जातात. आता यापुढे एकाही व्हिडिओ गेम पार्लरसाठी परवाना दिला जाणार नाही. तसेच यापूर्वी दिलेले परवानेही रद्द करण्याचा ठराव महासभेत ऐनवेळी करणार असल्याचे महापौर हारुण शिकलगार यांनी सांगितले.