सांगली जिल्ह्यातील अपात्र २०७८ शेतकरी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 01:21 AM2017-12-02T01:21:01+5:302017-12-02T01:23:00+5:30

सांगली : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील त्रुटी असलेल्या २०७८ शेतकºयांची दुरुस्ती यादी

 Ineligible 2078 farmers of Sangli district | सांगली जिल्ह्यातील अपात्र २०७८ शेतकरी पात्र

सांगली जिल्ह्यातील अपात्र २०७८ शेतकरी पात्र

Next
ठळक मुद्दे दुरुस्ती यादी शासनाकडे : लाभार्थींना सहकार विभागाचा दिलासावेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तांत्रिक चुका समोर आल्या होत्या

सांगली : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील त्रुटी असलेल्या २०७८ शेतकºयांची दुरुस्ती यादी शासनाच्या पोर्टलवर शुक्रवारी पुन्हा अपलोड करण्यात आली. कर्जमाफीच्या योजनेपासून संबंधित लाभार्थी वंचित राहणार असल्याची भीती निर्माण झाली होती. पात्र शेतकºयांचे नुकसान होणार नसल्याची दक्षता घेत दुरुस्ती यादी शासनाकडे परत पाठविण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतगत मागील आठवड्यापासून कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा होत आहे. जिल्ह्यासाठी १९ हजार ७७४ शेतकºयांना ७२ कोटी कर्जमाफी मिळाली आहे. ती जिल्हा बँकेने विकास सोसायट्यांच्या आणि सोसायट्यांनी संबंधित कर्जदार शेतकºयांच्या खात्यावर जमा केली आहे. कर्जमाफी योजनेतील शेतकºयांची खाती बंद करण्यात येत असताना, त्यातील अनेक शेतकºयांच्या यादीत त्रुटी आढळून आल्या. त्रुटी आढळल्याने वीस हजार शेतकºयांपैकी दोन हजार ७८ शेतकरी अपात्र ठरणार असल्याचे अटळ होते. त्या शेतकºयांची सहा कोटी ३४ लाख रुपये रक्कम असून ती शासनाकडे परत जाणार होती. शेतकरी पात्र असूनही कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती.

पात्र शेतकºयांवर अन्याय होणार नसल्याची दक्षता घेत जिल्हा मध्यवर्ती बँकेला दोन हजार ७८ शेतकºयांच्या यादीतील त्रुटी दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी बँकेला सुटी असतानाही अधिकारी आणि कर्मचारी यादीतील त्रुटींची दुरुस्ती करण्यात व्यस्त होते. रात्री उशिराने शासनाच्या पोर्टलवर पुन्हा दुरुस्ती यादी अपलोड करण्यात आली. यादीमध्ये कर्जदार शेतकºयांच्या नावात बदल, रकमेत तफावत होती. तसेच काही शेतकºयांची कर्जमाफीची रक्कम प्रोत्साहन अनुदान, तर प्रोत्साहन अनुदानाची रक्कम कर्जमाफीच्या यादीत होती. त्याची पडताळणी करुन ती दुरुस्त करण्यात आली. त्रुटी दुरुस्त करुन शासनाला पाठविण्यात आलेल्या यादीतील शेतकºयांची नावे ग्रीन यादीमध्येही दिसणार असल्याचे बँकेच्या अधिकाºयांनी सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी आणि कर्मचाºयांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील दोन हजार ७८ शेतकºयांना सहा कोटी ३४ लाखांच्या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. तसेच राज्य शासनाच्या सहकार विभागाच्या अधिकाºयांनीही अपात्र यातील दुरुस्तीस मंजुरी दिली आहे. यामुळे अपात्र दोन हजार ७८ शेतकºयांना कर्जमाफीचा फायदा होणार हे निश्चित झाले आहे. जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनीही अपात्र शेतकरी पात्र झाले असल्याचे सांगितले.

दरम्यान, शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सर्वच शेतकºयांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. यासाठी आंदोलनाचा लढा चालूच ठेवला आहे. या लढ्यामुळेही सरकार कर्जमाफीतील पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घेत आहे. तसेच अपात्र लाभार्थींना लाभही झाला नाही पाहिजे, याची सहकार विभागातील अधिकारी दक्षता घेत आहेत.

संख्या वाढणार : अधिकाºयांचे संकेत
सांगली जिल्ह्यात प्राप्त अर्जांपैकी १ लाख ७१ हजार कर्जदारांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा बॅँकेला, तर ५१ हजार कर्जदारांची माहिती देण्याचे आदेश अन्य बॅँकांना दिले होते. छाननीमध्ये यातील अनेकजण एकाच कुटुंबातील असल्यामुळे ही संख्या कमी झाली होती. आधार क्रमांक, कर्जाची रक्कम, थकबाकीचा तपशील अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तांत्रिक चुका समोर आल्या होत्या. त्या चुकांची दुरुस्ती सुरु होती. जिल्हा बँकेत यासाठी स्वतंत्र यंत्रणा कामाला लागली आहे. तांत्रिक दोष दूर करेपर्यंत बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी तांत्रिक दोष दूर केल्यामुळेच दोन हजार ७८ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे.

Web Title:  Ineligible 2078 farmers of Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.