corona virus खानापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:22 PM2020-05-11T12:22:40+5:302020-05-11T12:23:50+5:30
खानापूर तालुक्यातील साळशिंगे गावातील कोरोनाबधित महिलेचे कुटुंबीय देवनगर रस्त्यावरील वस्तीवर राहतात. या कोरोनाबाधित महिलेचे पती दीर यांचे अहमदाबाद-गुजरात येथे सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी कोरोनाबाधित महिला, तिचे पती व दीर आणि मुले असे सहाजण अहमदाबादहून साळशिंगे गावात आले होते. त्यावेळी तेथील दक्षता समितीने या सर्व कुटुंबियांचे दुसऱ्या एका घरात होम क्वारंटाईन केले होते.
विटा : खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील अहमदाबाद येथे वास्तव्य असलेल्या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खानापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून, नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने रविवारी रात्री साळशिंगे येथील देवनगर रोडवरील वस्ती सील केली. कोरोनाबाधित महिलेच्या कुटुंबियांना विटा येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.
खानापूर तालुक्यातील साळशिंगे गावातील कोरोनाबधित महिलेचे कुटुंबीय देवनगर रस्त्यावरील वस्तीवर राहतात. या कोरोनाबाधित महिलेचे पती दीर यांचे अहमदाबाद-गुजरात येथे सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी कोरोनाबाधित महिला, तिचे पती व दीर आणि मुले असे सहाजण अहमदाबादहून साळशिंगे गावात आले होते. त्यावेळी तेथील दक्षता समितीने या सर्व कुटुंबियांचे दुसऱ्या एका घरात होम क्वारंटाईन केले होते. संबंधित कोरोनाबाधित महिलेला त्रास जाणवू लागल्याने तिला विटा येथे उपचारासाठी दाखल केले होते.
त्यानंतर काल शनिवारी तिला व तिच्या पतीला मिरज येथे आयसोलेशन कक्षात दाखल करून तिच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. रविवारी या महिलेचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. याची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी शंकर बर्गे, तहसीलदार ऋषिकेत शेळके वैद्यकीय पथकासह थेट साळशिंगे येथे आले. देवनगर रस्त्यावरील वस्तीवर जाऊन संबंधित कोरोनाबाधित महिलेच्या घरातील सहा ते सात सदस्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान, या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आणखी कोणी आहे का, याची माहिती घेण्याचे काम सुरू होते.