महागाईच्या भट्टीत बेकरी व्यावसायिकांना चटके

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 01:56 PM2022-03-10T13:56:45+5:302022-03-10T13:57:08+5:30

महागाईमुळे आता बेकरी पदार्थांवरही दरवाढीचे संकट दाटले आहे. बेकरी उत्पादनात महत्त्वाचे घटक दरवाढीच्या भट्टीत भाजले जात असल्याने त्याची झळ व्यावसायिकांना बसली आहे.

Inflation is now a problem for bakery products | महागाईच्या भट्टीत बेकरी व्यावसायिकांना चटके

महागाईच्या भट्टीत बेकरी व्यावसायिकांना चटके

Next

अविनाश कोळी

सांगली : नफेखोरीमुळे देशांतर्गत बाजारात एकीकडे गहू, मैदा, डालड्याचे दर वाढले असून दुसरीकडे गॅस दरवाढीने त्यात तेल ओतले आहे. महागाईची गरम झालेली भट्टी आता बेकरी व्यावसायिकांना चटके देत असून आर्थिक अडचणींमुळे त्यांची चिंता वाढली आहे.

कमी दरात मिळणाऱ्या बेकरी पदार्थांमुळे अनेकांना आधार मिळत असतो,मात्र महागाईमुळे आता बेकरी पदार्थांवरही दरवाढीचे संकट दाटले आहे. बेकरी उत्पादनात महत्त्वाचे घटक दरवाढीच्या भट्टीत भाजले जात असल्याने त्याची झळ व्यावसायिकांना बसली आहे.

अशी वाढली महागाई (दर रु. किलो)

घटक मार्च २०२१ जानेवारी २२ मार्च २०२२

वनस्पती तेल १३३ १२५ १७०

पाम तेल १४० १३५ १७०

सूर्यफूल १६५ १४० १९०

सरकी १३६ १३७ १७०

मैदा २४ २४ ३१

गॅसने भडकावली आग

व्यावसायिक गॅसच्या दरात गेल्या महिन्यात तब्बल १०५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईची आग आणखी भडकली आहे. त्यातच आता डिझेलचे दर वाढले तर, वाहतूक खर्च वाढून त्याचाही परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरवाढ करण्याचा प्रस्ताव

सांगली, मिरज, कुपवाड बेकरी असोसिएशनमार्फत सध्या बेकरी पदार्थांच्या दरवाढीबाबत चर्चा सुरू झाली आहे. व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्यामुळे त्यांच्याकडून याबाबतचा प्रस्ताव तयार केला जात आहे.

बेकरीला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या घटकांचे दर वाढल्याने आमच्या अडचणी वाढत आहेत. त्यातच आता डिझेलच्या दरवाढीचे संकेत मिळत असल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. त्यामुळे दरवाढ करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. - नाविद मुजावर, खजिनदार, सांगली, मिरज, कुपवाड बेकरी असोसिएशन

Web Title: Inflation is now a problem for bakery products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली