महागाईने तेल ओतले, घराचे बजेट बिघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:32 AM2021-09-08T04:32:46+5:302021-09-08T04:32:46+5:30

सांगली : एकीकडे कोरोनाचा दंश, तर दुसरीकडे महागाईचे चटके अशा विचित्र अवस्थेत सामान्य नागरिकांच्या जगण्याची कोंडी झाली आहे. खर्चाचे ...

Inflation spills oil, household budget deteriorates! | महागाईने तेल ओतले, घराचे बजेट बिघडले!

महागाईने तेल ओतले, घराचे बजेट बिघडले!

Next

सांगली : एकीकडे कोरोनाचा दंश, तर दुसरीकडे महागाईचे चटके अशा विचित्र अवस्थेत सामान्य नागरिकांच्या जगण्याची कोंडी झाली आहे. खर्चाचे पारडे उत्पन्नाच्या पारड्यापेक्षा जड झाल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.

गेल्या सहा महिन्यांत खाद्यतेल, डाळी, किराणा साहित्य, पेट्रोल, डिझेल यासह सर्वच गोष्टींनी महागाईची शिडी चढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्वयंपाकघराचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे वाढत्या महागाईने जगताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

चौकट

तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा महिन्याचा वाढलेला खर्च

वस्तू एकूण खर्च (रुपयांत)

तेल १२००

धान्य ११५०

शेंगदाणे १२०

सिलिंडर १५००

दूध १७००

साखर २९६

चहा पावडर ५००

डाळ ४५०

साबुदाणा १००

पेट्रोल १५००

एकूण ८,५१६

चौकट

अशी वाढली महागाई

वस्तू जानेवारीतील सध्याचा दर

शेंगदाणा तेल १५८ १७२

सोयााबीन तेल १५८ १६२

शेंगदाणे १०५ १२०

साखर ३५ ३८

साबुदाणा ६० ६०

मोहरी ८० ११०

तूरडाळ १०० ११०

उडीद ९५ ११०

मसूर ८० १००

हरभरा १६० १७०

मूगडाळ १०० १२०

गृहिणी म्हणतात...

लॉकडाऊनमध्ये उत्पन्न घटले असताना दुसरीकडे महागाई वाढतच आहे. कोणत्याही वस्तूचे दर कमी झाले नाहीत. अशा स्थितीत सामान्य माणसाने जगायचे तरी कसे?

- सारिका पाटील

महागाई ही पाचवीला पुजली आहे. महिन्याचा बाजार घेताना प्रत्येकवेळी खर्च वाढत आहे. अशावेळी काटकसर कशी आणि काेणत्या गोष्टीत करायची, हे शासनानेच सांगावे.

- मुक्ता जाधव

चौकट

वरणाची फोडणी महाग

तूरडाळीने शंभरी ओलांडल्याने प्रत्येक मराठी माणसाच्या घरात आवडीने खाल्ले जाणारे वरण आता महागाईने कडवट झाले आहे. तुरडाळीचा वापर कमी करण्याकडेही अनेकांचा कल दिसत आहे. अन्य डाळींबाबतही नागरिकांचा अनुभव तसाच आहे.

Web Title: Inflation spills oil, household budget deteriorates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.