माहिती उपसंचालक अनिरूध्द अष्टपुत्रे यांचे सांगलीत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 05:51 PM2019-05-31T17:51:15+5:302019-05-31T18:09:09+5:30
कोल्हापूर विभागाच्या माहिती उपसंचालकपदी अनिरूध्द अष्टपुत्रे रूजू झाले असून त्यांनी आज जिल्हा माहिती कार्यालय, सांगली कार्यालयास भेट दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माहिती अधिकारी संप्रदा बीडकर व कर्मचारी उपस्थित होते.
सांगली : कोल्हापूर विभागाच्या माहिती उपसंचालकपदी अनिरूध्द अष्टपुत्रे रूजू झाले असून त्यांनी आज जिल्हा माहिती कार्यालय, सांगली कार्यालयास भेट दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माहिती अधिकारी संप्रदा बीडकर व कर्मचारी उपस्थित होते.
माहिती उपसंचालक अनिरूध्द अष्टपुत्रे जिल्हा माहिती अधिकारी रायगड-अलिबाग या पदावर कार्यरत होते. तेथून पदोन्नतीने त्यांची कोल्हापूर माहिती उपसंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी ठाणे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले असून, कोकण विभागाचे प्रभारी उपसंचालक म्हणूनही काही काळ काम केले आहे. तसेच, त्यांनी 20 वर्षे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालक व वरिष्ठ सहायक संचालक म्हणून काम पाहिले.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयात जबाबदारी सांभाळली आहे. मंत्रालयात वृत्त शाखेत कार्य अधिकारी, दृक श्राव्य विभाग, अधिपरीक्षक पुस्तके व प्रकाशने शाखा, महान्यूज पोर्टल यांचे कामही त्यांनी सांभाळले आहे.
महासंचालनालयाकडील सुमारे 5 हजार दुर्मिळ आणि खुप जुन्या चित्रपट, वृत्तचित्र आणि माहितीपटांच्या डिजिटलायझेशनचे काम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. कोकण विभागाच्या उपसंचालक पदाचा कार्यभारत असताना त्यांनी किल्ले रायगडची सचित्र माहिती असणाऱ्या कॉफी टेबल बुकची निर्मिती केली होती. ठाणे येथे उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांना गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.