वाळवा येथे ओढा दुरुस्ती कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:29 AM2021-03-01T04:29:20+5:302021-03-01T04:29:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : पडवळवाडीच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला असलेल्या दोन्ही ओढ्यांमुळे जमिनीच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : पडवळवाडीच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला असलेल्या दोन्ही ओढ्यांमुळे जमिनीच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे क्षारपड जमीन वाढत आहे. याचे प्रमाण कमी व्हावे आणि नापीक जमीन सुपीक बनावी यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या ओढ्याच्या खुदाई व सरळीकरणास ३१ लाख रुपयांचा निधी दिला आहे, अशी माहिती वाळवा पंचायत समितीचे उपसभापती नेताजी पाटील यांनी दिली.
पडवळवाडीतून कृष्णा नदीत मिळणाऱ्या पूर्व व पश्चिम अशा सात कि. मी. अंतराच्या दोन्ही ओढ्याच्या दुरुस्ती सरळीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
यावेळी बावचीचे सरपंच वैभव रकटे, पडवळवाडीचे माजी सरपंच सुधीर नांगरे, विनायक अनुसे, विशाल कोकाटे, बावचीचे पोलीस पाटील शरद क्षीरसागर, पडवळवाडीचे माजी पोलीस पाटील आनंदराव यादव, निवास खोत, भीमराव खोत, विनायक फार्णे उपस्थित होते.