संख येथील खाजगी रुग्णालयाची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:27 AM2021-05-06T04:27:08+5:302021-05-06T04:27:08+5:30
संख : संख (ता. जत) येथील खाजगी रुग्णालयास तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर यांनी भेट दिली. यावेळी अनेक रुग्णांना ...
संख : संख (ता. जत) येथील खाजगी रुग्णालयास तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर यांनी भेट दिली. यावेळी अनेक रुग्णांना सलाईन लावलेले होते. एका महिला रुग्णाची कोविड रॅपिड टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली.
संख येथील खाजगी डॉक्टरने स्वतःची इमारत सोडून दुसरी इमारत भाड्याने घेतली होती. या ठिकाणी रुग्णांना आणून उपचार करणे, जादा बिल आकाराने, रक्त तपासण्यासाठी बाहेर पाठविणे, तसेच कोविड रुग्णांंची तपासणी करीत असल्याची तक्रार तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर यांच्याकडे आली होती. त्या अनुषंगाने खाजगी दवाखान्याला भेट देऊन तपासणी केली.
तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर यांनी कोरोना लक्षणे असणाऱ्या रुग्णांची ॲन्टिजन टेस्ट, आरटीपीसीआर करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राला पाठवावे. त्याची माहिती द्यावी, अशी सक्त सूचना केली.