मिरजेतील रेल्वे स्थानक रस्त्याची आयुक्तांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:22 AM2020-12-25T04:22:06+5:302020-12-25T04:22:06+5:30
मिरजेत रेल्वे स्थानक ते बस स्थानक या शहरातील प्रस्तावित आदर्श रस्त्याच्या कामाची पाहणी आयुक्त कापडणीस यांनी केली. ...
मिरजेत रेल्वे स्थानक ते बस स्थानक या शहरातील प्रस्तावित आदर्श रस्त्याच्या कामाची पाहणी आयुक्त कापडणीस यांनी केली. रेल्वे स्थानक ते एसटी स्थानक रस्ता सुमारे अडीच कोटी खर्चाचा असून हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात येणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी व त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येणार आहेत. हा रस्ता शहरातील आदर्श रस्ता असून या रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावरील खोकी तात्पुरती स्थलांतरित करण्यात येणार आहेत. रस्त्याचे काम सुरू करण्याचे निर्देश आयुक्त कापडणीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.
सांगलीतील राम मंदिर चौक ते सिव्हिल हॉस्पिटल चौक आणि मिरजेतील रेल्वे स्थानक ते बस स्थानक हे दोन महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. या कामाला तातडीने सुरुवात करून हा रस्ता दोन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी ठेकेदाराला दिल्या. शनिवारपासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी उपमहापौर आनंदा देवमाने, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक निरंजन आवटी, नगरसेवक संदीप आवटी, सुरेश आवटी, गजेंद्र कुल्लोळी यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते.
फोटो-२४मिरज०२