जतमध्ये रस्ते कामाची अधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:53+5:302021-07-23T04:17:53+5:30
जत शहरातून जाणारे मार्गावर पडलेले खड्डे त्वरित भरावेत व रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ...
जत शहरातून जाणारे मार्गावर पडलेले खड्डे त्वरित भरावेत व रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे व उपाध्यक्ष विकास साबळे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले होते. याची दलख घेत गुरुवारी राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरण विभाग, कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता सायगावकर व त्यांच्या पथकाने जतमध्ये राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली.
पहिल्यांदा पंचायत समिती सभागृहात आमदार विक्रम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यानंतर अधिकाऱ्यांसह संजय कांबळे यांनी रस्ते कामाची पाहणी केली. यावेळी जतचे उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांनी राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरण विभाग कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता सायगावकर यांना शहरातील राष्ट्रीय महामार्गामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, याकरिता रिंगरोड तसेच बायपास रस्ते करावेत, अशी सूचना केली.
220721\img-20210722-wa0040.jpg
रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनास यश
रस्ते विकास प्राधिकरण पथकाकडून पाहणी