शेटफळेत ‘रोहयो’च्या पथकाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:24 AM2021-02-12T04:24:20+5:302021-02-12T04:24:20+5:30
करगणी : शेटफळे (ता. आटपाडी) येथे झालेल्या रोजगार हमी योजनेच्या कामाची केंद्रीय पथकाकडून बुधवारी पाहणी करण्यात आली. यामध्ये ...
करगणी : शेटफळे (ता. आटपाडी) येथे झालेल्या रोजगार हमी योजनेच्या कामाची केंद्रीय पथकाकडून बुधवारी पाहणी करण्यात आली. यामध्ये विभागीय आयुक्त नैना बुहारांडो यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
यावेळी सामाजिक वनीकरण विभागातील बिहार वृक्ष लागवड पॅटर्न, सिमेंट काँक्रीटचे बनविलेले रस्ते यासह अन्य कामांची पाहणी पथकाकडून करण्यात आली. नैना बुहोरांडो यांनी समृद्ध गाव योजनेची माहिती दिली. ग्रामीण भागातील शेतकरी समृद्ध करण्यासाठी केंद्र शासनाने ‘रोहयो’ विभागाच्या विविध सात योजनांचे एकत्रीकरण करून समृद्ध गाव योजना तयार केली आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी विभागीय कार्यक्रम विस्तार अधिकारी अभिजित खाडे, नायब तहसीलदार डी. एस. राठोड, सरपंच नीता गायकवाड, उपसरपंच निवृत्ती गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गायकवाड, विजय देवकर, रूपेश गायकवाड, सुभाष बाड, आदी उपस्थित होते.