उपचाराऐवजी ३ रुग्णांना रस्त्यावर फेकले; मिरजमध्ये दोघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 04:47 AM2019-11-10T04:47:34+5:302019-11-10T04:47:42+5:30
तीन रुग्णांना उपचार न करता सांगलीत निर्जन रस्त्यावर फेकून दिल्याबद्दल व त्यातील एकाचा नंतर मृत्यू झाल्याने रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध शनिवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मिरज (सांगली) : मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तीन रुग्णांना उपचार न करता सांगलीत निर्जन रस्त्यावर फेकून दिल्याबद्दल व त्यातील एकाचा नंतर मृत्यू झाल्याने रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध शनिवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक अनिल नरसिंगकर व सफाई कर्मचारी सागर साळोखे अशी त्यांची नावे आहेत. नरसिंगकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
शंकर शिंदे, पीरसाब मोमीन व शिवलिंग कुचनुरे या रुग्णांना उपचार न करता रुग्णालयाबाहेर टाकून दिल्याचा प्रकार २ नोव्हेंबरला उघड झाला. सांगलीतीलजुन्या कुपवाड रस्त्यावर अंधारात तीन अत्यवस्थ रुग्ण पडल्याचे नागरिकांना दिसले. त्यांनी संजयनगर पोलिसांत माहिती देऊन तिघांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान कुचनुरे यांचा मृत्यू झाला. यादरम्यान मिरज शासकीय रुग्णालयातून तिन्ही रुग्णांना दुसºया रुग्णालयात नेत असल्याचे सांगून, सांगलीत निर्जन रस्त्यावर फेकल्याचे निष्पन्न झाले. रुग्णालय प्रशासनाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर अत्यवस्थ रुग्णांना विनापरवाना बाहेर टाकणाºया वैद्यकीय कर्मचाºयांविरुद्ध वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता भोसले यांनी शुक्रवारी रात्री गांधी चौक पोलिसांत फिर्याद दिली होती.