येलूर पाणीपुरवठा संस्थेतर्फे विम्याचा धनादेश प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:26 AM2021-04-02T04:26:29+5:302021-04-02T04:26:29+5:30
येलूर सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्यावतीने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजन महाडिक, धनाजीराव पाटील यांच्याहस्ते उज्ज्वला आडके यांना विम्याचा धनादेश देण्यात आला. ...
येलूर सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्यावतीने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजन महाडिक, धनाजीराव पाटील यांच्याहस्ते उज्ज्वला आडके यांना विम्याचा धनादेश देण्यात आला. यावेळी भगवानराव जाधव, सरदार गायकवाड उपस्थित होते.
येलूर : येलूर सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे कर्मचारी कृष्णात खासेराव आडके याचे मागील वर्षी अपघाती निधन झाले होते. संस्थेच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांचा विम्याचा धनादेश देण्यात आला.
संस्थेच्यावतीने पाणीपुरवठा संस्थेत काम करणाऱ्या सर्व कामगारांचा जीवन विमा काढण्यात आला आहे. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजन महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रगतशील शेतकरी धनाजीराव पाटील यांच्याहस्ते कृष्णात आडके यांच्या पत्नी उज्ज्वला आडके, मुलगा अजय आडके यांच्याकडे धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भगवानराव जाधव, उपाध्यक्ष सरदार गायकवाड, हौसेराव पाटील, विजय जाधव, विमा प्रतिनिधी महेश जाधव, माणिक पाटील उपस्थित होते.