मुंबईत अण्णा भाऊंचे आंतरराष्टÑीय दर्जाचे स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 03:56 PM2019-08-02T15:56:49+5:302019-08-02T15:58:53+5:30

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येणार असून, तेथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करण्यात येणार आहे. मुंबईत जेथे अण्णा भाऊंचे वास्तव्य होते, तेथे आंतरराष्टÑीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी गुरुवारी केले.

International brother-in-law memorial of Anna Bhau in Mumbai | मुंबईत अण्णा भाऊंचे आंतरराष्टÑीय दर्जाचे स्मारक

मुंबईत अण्णा भाऊंचे आंतरराष्टÑीय दर्जाचे स्मारक

Next
ठळक मुद्देमुंबईत अण्णा भाऊंचे आंतरराष्टÑीय दर्जाचे स्मारकअण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर चित्रपट करणार

कासेगाव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येणार असून, तेथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करण्यात येणार आहे. मुंबईत जेथे अण्णा भाऊंचे वास्तव्य होते, तेथे आंतरराष्टÑीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी गुरुवारी केले.

अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ वाटेगाव (ता. वाळवा) या जन्मगावी सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देश्मुख, निशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरेश खाडे म्हणाले की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, वाटेगावात स्मारकाच्या विकासासाठी ५० लाख रुपये देण्यात येणार आहेत. राज्यात जेथे त्यांचे पुतळे आहेत, तेथे त्या पुतळ्यांवर मेटॅलिक डोम उभारण्यात येतील.

सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्य सरकारने मातंग समाज व इतरांसाठी विविध प्रकारच्या योजना आखल्या असून त्याअनुषंगाने मागास समाजाचा सर्वांगीण विकास होणार आहे. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी वास्तव विषयांवर संवेदनशील लेखन केले. त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, ललित लेखन, पोवाडे, शाहिरी गीते लिहिली. ते लेखन अजरामर झाले आहे.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिन हुलवान, वाटेगावचे सरपंच सुरेश साठे, सावित्री साठे, राहुल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: International brother-in-law memorial of Anna Bhau in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.