सांगली जिल्ह्यातील १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या, पोलिस अधिक्षकांचे आदेश
By शरद जाधव | Updated: July 14, 2023 18:55 IST2023-07-14T18:54:32+5:302023-07-14T18:55:08+5:30
दोन निरीक्षक, १० सहायक निरीक्षक तर एका उपनिरीक्षकाचा समावेश

सांगली जिल्ह्यातील १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या, पोलिस अधिक्षकांचे आदेश
सांगली : जिल्हा पोलिस दलात इतर जिल्ह्यातून हजर झालेल्या अधिकाऱ्यांना अखेर पदस्थापना देण्यात आल्या. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी याबाबतचे आदेश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील १३ पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात दोन निरीक्षक, १० सहायक निरीक्षक तर एका उपनिरीक्षकाचा समावेश आहे.
इतर जिल्ह्यातून हजर झालेले निरीक्षक अरूण सुगावकर यांची गुप्तवार्ता कक्षाकडे तर श्रीकृष्ण कटकधोंड यांची वाचक १ म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. सहायक निरीक्षक सुशांत पाटील यांची सांगली ग्रामीण, जयसिंग पाटील यांची शिराळा, नितीन कुंभार यांची महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे मिरज, शिवानंद कुंभार यांची सांगली शहर, मनोजकुमार लोंढे यांची संजयनगर येथे बदली करण्यात आली आहे. सहायक निरीक्षक समीर ढोरे यांना सांगली शहर येथे तर तासगावचे नितीन केराम यांना एकवर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
सहायक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांची विटामधून आटपाडी, विशाखा झेंडे यांची महिला कक्षाकडे, सिकंदर वर्धन यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, प्रदीप शिंदे यांची दहशतवाद विरोधी पथकामध्ये तर विजय कार्वेकर यांची वाचक २ म्हणून बदलीचे आदेश देण्यात आले आहेत.