कवलापुरातील बंदीस्त गटार योजना कामाची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:24 AM2021-08-01T04:24:22+5:302021-08-01T04:24:22+5:30

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतीतर्फे सुरु असलेल्या बंदीस्त गटार योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

Investigate the closed sewer scheme work in Kavalapur | कवलापुरातील बंदीस्त गटार योजना कामाची चौकशी करा

कवलापुरातील बंदीस्त गटार योजना कामाची चौकशी करा

Next

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतीतर्फे सुरु असलेल्या बंदीस्त गटार योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, १४ व्या वित्त आयाेगाच्या निधीतून सध्या बंदीस्त गटाराचे काम सुरु आहे. गावातील प्रमुख रस्त्यांच्या दोन्ही बाजूने हे काम सुरु आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, पाईप टाकताना पायाभरणीवेळी मोठी खडी, वाळू, मुरुम, क्रश आदींचा वापर करण्यात आलेला नाही. योग्य व्यासाचे पाईपही नसल्याने भविष्यात याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे या कामाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मनोज शिंदे, दत्तात्रय चव्हाण, कृष्णात झेंडे, प्रदीप जाधव, जितेंद्र पाटील, चंद्रकांत माळी आदींच्या शिष्टमंडळाने हे निवेदन जिल्हाधिेकाऱ्यांना दिले.

Web Title: Investigate the closed sewer scheme work in Kavalapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.