कडेगाव नगरपंचायतच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:33 AM2021-09-08T04:33:21+5:302021-09-08T04:33:21+5:30
कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची वरिष्ठ स्तरावरून चौकशी लावावी. दोषींवर कायदेशीर करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असे निवेदन ...
कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची वरिष्ठ स्तरावरून चौकशी लावावी. दोषींवर कायदेशीर करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असे निवेदन राष्ट्रवादीचे नेते डी. एस. देशमुख व वंचित आघाडीचे जीवन करकटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की नगरपंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. कडेगावमध्ये हाय स्पीड लॅम्पचे काम एका कंपनीला दिले असून, त्या लॅम्पची सात वर्षांची जबाबदारी कंपनीची आहे. तरीही हे लॅम्प बंद अवस्थेत आहेत. नगरपंचायत याबाबत कार्यवाही करताना दिसत नाही. नगरपंचायतने उभारलेल्या बालोद्यानामधील खेळणी व साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. हे साहित्य मोडकळीस आले आहे. येथे भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. हे बालोद्यान कोणत्या सिटी सर्व्हे गटात उभारले आहे याचीही चौकशी करून माहिती द्यावी.
येथील भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी अन्यथा १८ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावरून उडी मारून तीव्र आंदोलन करू असे डी. एस. देशमुख व जीवन करकटे यांनी निवेदनात म्हटले आहे.