बावची आरोग्य केंद्र कारभाराची चौकशी करा

By admin | Published: February 5, 2016 10:51 PM2016-02-05T22:51:16+5:302016-02-05T23:42:47+5:30

वाळवा पं. स. सभेत सदस्यांची मागणी : रुग्ण कल्याण समितीची चार वर्षात बैठक नाही

Investigate the health of the BW's Health Center | बावची आरोग्य केंद्र कारभाराची चौकशी करा

बावची आरोग्य केंद्र कारभाराची चौकशी करा

Next

इस्लामपूर : गेल्या चार वर्षांत रुग्ण कल्याण समितीची एकही बैठक न घेणाऱ्या बावची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराची चौकशी करावी, तसेच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आज (शुक्रवार) सदस्यांनी सभेत केली. दरम्यान, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन त्याचा आराखडा तयार करा, असे निर्देश सभापती रवींद्र बर्डे यांनी दिले.
येथील पंचायत समितीच्या राजारामबापू पाटील सभागृहात सभापती रवींद्र बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती सौ. भाग्यश्री शिंदे, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, सहायक गटविकास अधिकारी यशवंत भांड यांच्या उपस्थितीत सभा झाली. बागणीतील दोन जि. प. शाळांनी आयएसओ मानांकन मिळविल्याबद्दल शिक्षक, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी व शिक्षण विभागाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. विष्णुपंत थोरात, बाळासाहेब पाटील यांना सभागृहाने आदरांजली वाहिली.
सभा वादळी ठरली. चर्चेवेळी डॉ. अशोक सुतार यांना सदस्यांनी धारेवर धरले. आरोग्याच्या कामाचा समाचार घेतला. कुरळप आरोग्य केंद्रात रुग्णांना सलाईन मिळत नाही, त्यासाठी पैसे घेतले जातात, असे अरविंद बुद्रुक यांनी सांगताच, सुतार यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा, असे म्हटल्यावर सभागृहातील वातावरण तापले. नंदकुमार पाटील यांनी तर, मग भ्रष्टाचार करणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांची नावे आम्हाला लाचलुचपतला कळवावी लागतील, असा टोला मारला.
जयकरराव नांगरे-पाटील यांनी, गटविकास अधिकाऱ्यांनी खातेप्रमुखांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली. सभापती बर्डे यांनी रुग्ण कल्याण समितीच्या बैठका होतात का? त्याचा आढावा घेता का? असे प्रश्न विचारले. रेखा कोळेकर यांनी बावची केंद्राची ४ वर्षांत एकही बैठक झाली नसल्याचा आरोप केल्यावर सदस्यांनी एकमुखाने कारवाईची मागणी केली.
पंचायत समितीच्या निधीतून समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय समाजातील २८ लाभार्थ्यांना शिलाई यंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे, मात्र जातीचे दाखले मिळत नसल्याने लाभार्थी यादी तयार झालेली नाही. तलाठी पैसे घेतल्याशिवाय दाखले देत नाहीत, असा आरोप अरविंद बुद्रुक यांनी केला. त्यावर जेवढी नावे आली आहेत, त्यांना शिलाई यंत्र वाटप करा, अशी मागणी नंदकुमार पाटील यांनी केली, ती मान्य करण्यात आली.
विशेष घटक योजनेतील विहीर खोदलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान शनिवारी लाभार्थ्यांना मिळेल, असे कृषी अधिकारी एस. एस. पाटील यांनी सांगितले.
सभेत राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सभेतील चर्चेत सुभाष पाटील, शोभा देसावळे, प्रीती

Web Title: Investigate the health of the BW's Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.