सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 11:01 AM2024-05-29T11:01:35+5:302024-05-29T11:01:56+5:30
Raju Shetty : माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे.
Raju Shetty ( Marathi News ) : माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमून या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. या बँकेची चौकशी व्हावी यासाठी शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
"सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे राजकारण्यांचा एक अड्डा झालेला आहे. इथल्या सगळ्या नेत्यांचे राजकारण सांभाळण्यासाठी बँकेत घोटाळे होतात, भ्रष्ठाचार होतात, त्यावर सातत्याने पांघरुन घातले जाते. मी त्याविरोधात तक्रारी केल्या आहेत पण, सरकार यावर लक्ष द्यायला तयार नाही. सध्या बँकेतील कर्मचाऱ्यांवर बँकेतील संचालक मंडळाचा अंकुशच राहिलेला नाही. कदाचित संचालक मंडळ घोटाळ्यात सामील असू शकतं. २ कोटी ४४ लाख एवढ्या सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा घातला आहे. तासगाव, निमणी, सिद्धेवाडी, निलकरंजी, हातनूर, बसर्गी या शाखांमध्ये हा घोटाळा झाला आहे. अजून काही शाखेत तपासणी केली तर घोटाळा सापडेल, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव
"शेतकऱ्यांचे दुष्काळाचे पैसे, अतिवृष्टीचे पैसे, ठेवीवरचे व्याज बोगस खाती काढून, बोगर एन्ट्री करुन या कर्मचाऱ्यांनी हे पैसे काढले आहेत. अर्थात याला राजकीय पाठबळ असणार आहे. म्हणून मी शासनाला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून बँकेवर प्रशासक नेमून चौकशी करण्याची मागणी केली आहे. या वर्षीचा ताळेबंद आहे तो खोटा आहे, त्यामुळे याची सखोल चौकशी झाली तर सर्वच बाहेर येईल, अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केला आहे.
बँकेवर प्रशासक नेमून चौकशी करावी
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सर्वसामान्यांची आहे, ही बँक पुन्हा अडचणीत आली तर जिल्ह्यासह, सामान्यांच नुकसान होणार आहे, म्हणून या अशा भ्रष्ठ प्रवृत्तीला ठेचून काढावं अन्यथा आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही, पहिल्यांदा शासनाने या बँकेवर प्रशासक नेमावा आणि सखोल चौकशी करावी एवढीच आमची मागणी आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले.