संगीता खोत यांच्या शपथपत्राची चौकशी
By admin | Published: January 7, 2015 11:06 PM2015-01-07T23:06:23+5:302015-01-07T23:25:14+5:30
निवडणूक आयोगाचे आदेश : महापालिकेकडून कारवाईस टाळाटाळ
मिरज : मिरजेत महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या स्वाभिमानी आघाडीच्या संगीता विठ्ठल खोत यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याच्या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिला आहे. संगीता खोत यांनी निवडणूक अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात अपूर्ण व चुकीची माहिती दिल्याची तक्रार पराभूत राष्ट्रवादी उमेदवार रूबाबबी रफिक खतीब यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत एक वर्षापूर्वी निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना तक्रारीबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते; मात्र महापालिका आयुक्तांनी राज्य निवडणूक आयोगाला कोणताही अहवाल सादर केला नाही. त्यामुळे रूबाबबी खतीब यांनी आयुक्तांवर राजकीय दबाव असल्यामुळे कारवाईला टाळाटाळ होत असल्याची तक्रार पुन्हा निवडणूक आयोगाकडे केली आहे. आयुक्त अजिज कारचे यांना तत्काळ कारवाई करून तक्रारीबाबत तातडीने अहवाल देण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव नि. ज. वागळे यांनी दिला आहे. राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारीबाबत निवडणूक आयोगाने आयुक्तांकडे विचारणा केली आहे. निवडणूक गैरप्रकाराबाबत आयुक्तांनी न्याय दिला नाही, तर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे रूबाबबी खतीब यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीत संगीता विठ्ठल खोत यांनी निवडणुकीचे शपथपत्र जोडलेले होते. त्यामध्ये अपूर्ण व चुकीची माहिती दिल्याची तक्रार रूबाबी रफिक खतीब यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. याबाबत निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना यापूर्वी तक्रारीबाबत अहवाल सादर करावा, असे आदेश दिले होते. मात्र महापालिका आयुक्तांनी आजपर्यंत कोणताही अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केला नाही. त्यामुळे रूबाबबी रफिक खतीब यांनी पुन्हा निवडणूक आयोगाकडे राजकीय दबावामुळे कारवाईला टाळाटाळ होत असल्याची तक्रार केली. (वार्ताहर)
उच्च न्यायालयात दाद मागणार : खतीब
निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त अजिज कारचे यांना तात्काळ कारवाईचे आदेश देऊन त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव नि. ज. वागळे यांनी महापालिकेला दिला आहे. राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारीबाबत निवडणूक आयोगाने आयुक्तांकडे विचारणा केली आहे. महापालिका आयुक्तांनी न्याय नाही दिला तर, आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे खतीब यांनी सांगितले.