इस्लामपुरात परिवर्तन लाट

By admin | Published: November 2, 2016 12:17 AM2016-11-02T00:17:30+5:302016-11-02T00:17:30+5:30

सदाभाऊ खोत : जनतेला पालिका सत्तेत बदल हवा आहे

Islam floods change | इस्लामपुरात परिवर्तन लाट

इस्लामपुरात परिवर्तन लाट

Next

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत जनतेला बदल हवा आहे. जनतेच्या मनात सत्ता परिवर्तन करण्याची सुप्त लाट आहे. गेल्या ३१ वर्षांच्या सत्ता काळातून जनतेला पिळून मिळवलेला सत्ताधाऱ्यांचा काळा पैसा बाहेर येणार आहे. मात्र सत्ताधाऱ्यांच्या या काळ्या पैशाला भीक न घालता जनता विकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे राहील, असा विश्वास कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.
येथील निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खोत म्हणाले, या निवडणुकीसाठी विकास आघाडीत सर्वांना सामावून घेतले आहे. अपक्ष उमेदवारांशी चर्चा करीत आहोत. त्यातून सन्मानजनक तोडगा निघेल. विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत होईल. सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार, जनतेला वेठीस धरुन काम करण्याची पद्धत, खुंटलेला विकास अशा सर्व समस्यांवर मतदारांमध्ये कमालीची नाराजी आहे. सत्ताधाऱ्यांनी पैशाची केलेली वारेमाप उधळणही जनतेने डोळ्यांनी पाहिली आहे.
खोत म्हणाले, राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांच्या दहशतीमुळे व्यापारी, सर्वसामान्य जनता, विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शहराचा विस्तार करताना अपेक्षित विकास साधण्याची दृष्टी सत्ताधाऱ्यांकडे नाही. त्यामुळे गुंठेवारी व उपनगरातील जनजीवन बकाल बनले आहे. तेथील घरे बांधून राहिलेले नागरिक कारवाईची टांगती तलवार घेऊन राहात आहेत. शहरात सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्यावरच सावकारीचे दुष्टचक्र फोफावले आहे. त्यातून तरुण आत्महत्या करीत आहेत. राहत्या जागेला अकृषक दाखला (एन.ए.) न मिळाल्याने कर्ज मिळत नाही. त्यामुळे सावकाराच्या दारात जाण्याशिवाय जनतेस पर्याय उरलेला नाही. सत्ताधाऱ्यांमुळेच हे सावकार सोन्याने पिवळे झाले आहे.
खोत म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाचे भीती घालून जमिनी बळकावण्याचा गोरख धंदा केला. विकास आघाडीची सत्ता आल्यावर अन्यायी आरक्षणे रद्द करणार, खुल्या जागा नागरिकांच्या सहमतीने विकसित करणार. यावेळी निशिकांत पाटील, विजय पवार, महेश खराडे, भागवत जाधव उपस्थित होते. (वार्ताहर)
भिंत पाडून : पाय बाहेर!
४खोत म्हणाले, अंथरुण पाहून पाय पसरावेत, असा व्यावहारिक जीवनातील सामाजिक संकेत आहे. मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नुसते अंथरुणच नव्हे, तर भिंती पाडून आपले पाय बाहेर काढले. त्यामुळे शहराची अशी अवस्था झाल्याचा आरोप त्यांनी केला.
४निशिकांत पाटील म्हणाले, आम्ही कोणाला हरवण्यासाठी ही निवडणूक लढवत नाही. शहराच्या विकासाचा कार्यक्रम घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. कोणी २४-२५ म्हणत असेल, मात्र आम्ही २९-० च करणार.

Web Title: Islam floods change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.